वरून पाहता असे वाटते कि त्याच्या जीवनात सुख असे नव्हतेच. त्याच्या बहुतेक कथा त्याच्या स्वतःच्या स्वप्नावर आधारित होत्या. ह्यावरून त्याला संपूर्ण आयुष्यांत किती भयानक स्वप्ने पडत होती हे लक्षांत येते.
तो जिवंत असताना त्याची पुस्तके विशेष खपली सुद्धा नाहीत. त्यामुळे त्याला प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळाले नाही. मरत असताना आपले संपूर्ण साहित्य निरर्थक आहे असेच समजून तो मेला.
पण ज्यावेळी लोव्हक्राफ्ट लिहीत होता त्याकाळी अनेक लहान तरुण मुले जी त्याचे साहित्य वाचत होती ती त्यामुळे प्रेरणा घेत होती. ह्यातील अनेक लोक भविष्यात मोठे लेखक झाले. आणि त्यांच्या मुले लोवक्राफ्ट सुद्धा प्रसिद्ध झाले. स्टीफन किंग हे सध्या जिवंत असेलेले सुप्रसिद्ध भयकथा लेखक आहेत. ते स्वतः लोवक्राफ्ट पासून प्रेरित झाले होते. रत्नाकर मतकरी ह्यांच्या काही भयकथा लोवक्राफ्ट पासून प्रेरित आहेत. गेम ऑफ थ्रोन्स च्या पुस्तकांत सुद्धा कुंथुलू आहे.
१९६० पासून लोवक्राफ्ट च्या लेखनापासून प्रेरणा घेतलेले चित्रपट येऊ लागले . १९८० मधील इव्हील डेड हे चित्रपट तुफान लोकप्रिय झाले. त्याशिवाय शेकडो टीव्ही आणि सिनेमा लोवकराफ्ट पासून प्रेरणा घेऊ निर्माण झाले.
आज काल लोवक्राफ्ट होर्रर्र हि आपली एक कॅटेगरी आहे. लोवक्राफ्टच्या भयकथान वैश्विक भयकथा असे संबोधित केले जाते कारण त्याची पात्रे वैश्विक स्थरावरची असतात.