सण हा राखीचा धागा सुखाचा
भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा,
कुठेही असो भाऊ,लागे जीवा ओढ
बहिणीची माया सागराच्या पार...

निघे भाऊ,बहिणीच्या घरा
चातकासम वाट,बघे ती अंगणात,
सासुरवाशीण ती,होई कावरी बावरी
क्षणा क्षणात मन,जाये माहेरात...

माहेरच्या आठवणी जपल्या मनात
पाखरास सांगे ती,गोष्टी एकांतात,
उतरून डोंगराची,अवघड ती वाट,
दिसे भाऊराया,तिच्या अंगणात...

आनंदासी पारावर,नसे बहिणीच्या
कोसोदुर भाऊ,आला राखी बांधाया
संध्याकाळ होता,ओवाळती भावा
राखी बांधूनी हाता,खुले भाऊराय...

बाहेर काळोखात,चंद्र लपला ढगात
पाहे चोरुनी,भावाबहीनीच्या प्रेमास,
राखी पौर्णिमेचा,दिवस किती थोर
वाहे आनंदाचा लोचनी महापूर...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel