चंद्र रोज पाहतो मी
पांढऱ्या शुभ्र जाईचा,
तापलेल्या दुधावरच्या
तपकिरी सायीचा...

जमती सारे भोवती
एकोपा किती मायेचा,
कोजागिरीच्या चंद्राला
स्पर्श खमंग सायीचा...

लखलखनाऱ्या चांदण्या
कळप जसा गाईचा,
पिवळा धमक उभा
पर्वत जणू राईचा

दुधासारखा घोटू द्या 
गोडवा येथे माणुसकीचा,
रांधलेल्या हातावरती
तपकिरी सायीचा...

संजय सावळे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel