तळहातावरती सांडून चांदण्या
अशीच रात्र उमलत जावी,
दाट काळोखात मिटूनी डोळे
मन मंदिरात तू हळूच यावी...
काळजाची धडधड माझ्या
क्षणिक थोडी थांबावी,
झंकार पावलांची
हृदयात माझ्या पडावी....
मन भ्रमर होऊनि
रात्र कळी उमलावी,
तुझ्या माझ्या प्रीतीची
वेल नवी खुलावी....
झोंबून गारवा मनी उरावा
अलगत भेट तुझी घडावी,
गगन भरारी मारून मन
आस तुझी कधी न सरावी....
संजय सावळे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.