एक साप एका लोहाराच्या दुकानात शिरून काहीतरी खाण्यासाठी शोधत होता. तेथे पडलेली एक कानस तो चावू लागला तेव्हा त्याचा धिक्कार करून कानस त्याला म्हणाली, 'अरे मूर्खा, तू माझ्या वाटेला जाऊ नकोस. लोखंड आणि पोलाद यांच्यासारख्या कठीण धातुला चावणार्‍या मला तू चावलास तर तुझे दात मात्र पडतील.'

तात्पर्य

- विरुद्ध पक्षाचे सामर्थ्य किती व आपले किती याचा विचार न करता जो प्रतिपक्षावर एकदम तुटून पडतो, तो बहुतेक वेळा स्वतःचा नाश करून घेतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel