एक कोंबडी उकिरडा उकरीत असता, काही सापांची अंडी तिला दिसली. मग त्यांची दया आल्याने ती उबवावी म्हणून ती त्यांच्यावर बसली. ते पाहून एक साळुंकी तिच्याजवळ आली व रागाने म्हणाली, 'अग बाई, तुला काय म्हणावं ? तू ह्या दुष्ट प्राण्याची कीव करते आहेस, पण मी तुला खात्रीने सांगते की, ही सापाची पिल्लं अंड्याबाहेर निघाली म्हणजे पहिल्याने तुझाच जीव घेतील.'

तात्पर्य

- पात्रतेचा विचार केल्याशिवाय उपकार करू नये.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel