एक गाढव शेतात चरत असता जवळच एका टोळाचे गाणे चालले होते, ते त्याने ऐकले. टोळाचा आवाज ऐकून, आपला जर आवाज असाच गोड असता तर बरे झाले असते, असे त्याला वाटले. म्हणून तो टोळाला विचारू लागला, 'काय रे, तू असे कोणते पदार्थ खातोस की ज्याच्यामुळे तुझा आवाज इतका गोड झाला ?' टोळ त्यावर म्हणाला, आम्ही नुसते दहिवर पिऊन राहतो, त्याचा हा परिणाम, हे ऐकून गाढवही नुसते दहिवर पिऊ लागले आणि अशक्तपणा येऊन थोड्याच दिवसांत मरण पावले.'
तात्पर्य
- एकाच्या प्रकृतीला जी वस्तू मानवली ती दुसर्याला मानवेलच असा नियम नाही. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.