एकदा एका शेतकर्याला शेत नांगरताना शेतात एक मोठा मोहोरांचा हंडा सापडला. तो पाहून त्या शेतकर्याला फार आनंद झाला. तो जमिनीवर साष्टांग नमस्कार घालून आपल्याला द्रव्य दिल्याबद्दल जमिनीचे आभार मानू लागला. तेव्हा त्याचे दैव त्याला म्हणाले, 'अरे, यावेळी तू या जमिनीचे आभार मानतो आहेस आणि माझी मात्र तुला आठवणही होत नाही. याऐवजी जर हे द्रव्य चोरीला गेलं असतं तर मात्र तू मलाच दोष दिला असतास !'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.