उन्हाने त्रासलेला बैल जवळच्या ओढ्याकडे गेला आणि थोडे गार वाटावे म्हणून पाण्यात जाऊन उभा राहिला. इतक्यात एक चिलट त्याच्या शिंगावर येऊन बसले व गर्वाने म्हणाले, 'बैलोबा, मी तुझ्याशी इतकी जवळीक करतो आहे, याबद्दल क्षमा कर. माझं वजन तुला पेलत नसेल तर मला स्पष्ट सांग, म्हणजे मी उडून जाऊन पलिकडच्या झाडावर बसेन.' त्यावर बैल म्हणाला, 'अरे, तुला वाटेल तर जा नाहीतर जाऊ नकोस त्याची मला मुळीच पर्वा नाही. तुझं हे बोलणं ऐकलं नसतं तर तू येथे बसला आहेस हे सुद्धा मला कळलं नसतं.'
तात्पर्य
- काही लोकांना स्वतःला मोठे महत्त्व आहे असे वाटते. पण खरे तर लोक त्यांना कवडीचीही किंमत देत नाहीत. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.