एका माणसाने नदीत गळ टाकला व त्याला एक मासा लागला. त्याला तो माणूस टोपलीत टाकणार तोच मासा त्याला म्हणाला, 'हे पुण्यवान पुरुषा, कृपाकरून मला पुनः नदीत टाक.' कोळ्याने विचारले, 'अरे, मी तुझ्यावर एवढे उपकार का बरं करावेत?' मासा म्हणाला, 'मी अजून लहान आहे, तेव्हा तुला आज माझा फारसा उपयोग होणार नाही. मी मोठा झाल्यावर तुला माझा जास्त उपयोग होईल.' कोळी त्यावर म्हणाला, 'होय, तूं म्हणतोस ते खरं, पण पुढे प्राप्त होणार्‍या वस्तूच्या आशेने आज हाती आलेली वस्तु टाकून देण्याइतका मी नक्कीच मूर्ख नाही.'

तात्पर्य

- हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे हा वेडेपणा होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to इसापनीती कथा १५१ ते २००


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत