एक गाढव रानात फिरत असता त्याला एक सिंहाचे कातडे सापडले. ते पांघरून तो रानात हिंडू लागला. त्याला पाहून हा सिंहच आहे अशा समजुतीने सगळे प्राणी भिऊन पळू लागले. याप्रमाणे कित्येक दिवस त्या गाढवाने मोठी अंदाधुंदी करून सगळ्या जनावरांस चकविले. पुढे एके दिवशी एक कोल्हा त्याला दिसला. तो त्याच्यावर मोठ्या आवेशाने चालून गेला आणि सिंहासारखा आवाज काढण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागला, पण गाढवाला सिंहासारखा आवाज कसा काढता येणार ? अर्थातच त्याचा आवाज ऐकून कोल्हा त्याला म्हणाला, ' मामा, आता पुरे करा. आपण जर क्षणभर आपली जीभ आवरली असती तर मीही आपणास सिंह समजून घाबरलो असतो, पण आपल्या ओरडण्यावरून आपण कोण आहात ते मी बरोबर ओळखलं आहे !'

तात्पर्य

- दुसर्‍याची नक्कल हुबेहूब करण्याचे काम फार कठीण आहे. नुसत्या पोशाखाच्या नकलेने काही भोळी माणसे कदाचित फसतील पण चतुर माणसे आवाजावरून व इतर हालचालीवरून माणसाचे खरे स्वरूप काय आहे, हे ओळखल्याशिवाय राहणार नाहीत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel

Books related to इसापनीती कथा १५१ ते २००


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत