अमेरिका खंडात एका जातीचा पक्षी आहे तो वाटेल त्या प्राण्याच्या आवाजाची अगदी हुबेहूब नक्कल करतो. पण आपले असे काही स्वर तो त्या आवाजात मिळवू शकत नाही. एकदा हा पक्षी रानातल्या एका झाडावर बसून तेथे गात असलेल्या कोकिळेची नक्कल करून तिला वेडावू लागला. ते पाहून कोकिळा त्याला म्हणाली, 'अरे आमच्या गाण्यात बरेच दोष असतील. ते आम्ही कबूल करतो. तेवढ्यासाठी तू आम्हाला वेडावून दाखविण्यापेक्षा आमच्या गाण्यातला दोष दाखवून त्यात सुधारणा सुचवशील तर तुला आम्ही काही मान देऊ.'

तात्पर्य

- दुसर्‍यास वेडावून त्याचा उपहास करण्यात मोठेसे भूषण नाही. तर त्याच्या चुका दाखवून त्यात सुधारणा करणे हे भूषण होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel