पंढरीसारिखें क्षेत्र नाहीं कोठें । जरी तें वैकुंठ दाखविलें ॥१॥

ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा कटीं कर देव कोठें ॥२॥

उदंड पाहिलीं उदंड ऐकिलीं । उदंड वर्णिलीं क्षेत्रतीर्थें ॥३॥

ऐसे हरिदास ऐसा प्रेमरस । ऐसा नामघोष सांगा कोठें ॥४॥

ऐसें विष्णुपद ऐसा वेणुनाद । ऐसा ब्रम्हानंद सांगा कोठें ॥५॥

ऐसा पुंडलीक ऐसा भीमातट । ऐसें वाळुवंट सांगा कोठें ॥६॥

तुका म्हणे आम्हां अनाथां कारण । पंढरी निर्माण केली देवें ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel