जे पुढारी झाले त्यातील प्रत्येकाने आपआपल्यापरी कामाची शर्थ केली, प्राण दिले, देह झिजविले. कशाकडेही पाहिले नषमल्लचे वाक्य  नाही; ते आपणा सर्वांस वंदनीय आहेत, पूज्य आहेत, आणि असलेच पाहिजेत. त्यांच्याप्रमाणेच आपणही निश्चयाने काम करावयास लागले पाहिजे. जे आपण हाती घेऊ त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास पाहिजे. 'One man with a conviction is equal to ninenty-nine without one' हे मिल्लचे वाक्य लक्षात ठेवणे जरूर आहे. आपण लोक आणा- शपथा घेतो; परंतु तदनुसार मरेपर्यंत किती वागतात? आपल्या कार्यावर आपली निष्ठा कोठे असते? आपण निष्ठा आहे असे दाखवितो आणि आपल्या लोकनायकांस फशी पाडतो. वस्तुत; नेटाने मेहनत करण्याची व स्वार्थत्याग करण्याची बुध्दी आम्हांत रूढ झालेलीच नाही. स्वत: कष्ट न करता, स्वत:च्या पदराला खार न लागता, आयते दुस-यांच्या प्रयत्नांनी मिळावे अशी आमची आप्पलपोटेपणाची बुध्दी असते! आणि म्हणूनच थोड्या साधू पुरुषांस जिवापाड मेहनत करावी लागते व त्यापायी ते प्राणासही मुकतात. रामतीर्थ, विवेकानंद, चिपळूणकार, गोखले यांच्या चरित्रांनी आपल्या हृदयाला काडीइतकीही वेदना होत नाही! होती तर वर दिलेल्या मोह-यांस दुप्पट जोर येतो. त्यांचा कार्यभार आपणही शिरावर थोडथोडा घेऊन हलका केला असता. आणि अशा प्रकारे ज्या मोह-यांस आपण आपल्या चेंगटपणामुळे अंतरलो, ते आपणांस मार्ग दाखविण्यास आज वावरते व आपल्या अडचणी सोडविते. आज म. गांदी हजारो सभांतून जे सांगत आले ते आपण करीत नाही. यासाठीच त्यांना एकवीस दिवसांचे प्रायोपवेशन स्वीकारावे लागले. अशावेळ ('देव करो आणि न होवो') जर काही अशुभ होते तर त्याचा दोष कोणावर येता? अर्थातच, आपणा सर्वांवर. असो. झाले ते झाले. परंतु अजूनही आपण शुध्दीवर येणार नाही तर आपणांसारखे हतभागी आपणच- आपला सर्व ठिकाणी दिसणारा निरुत्साह कधी मावळेल देव जाणे! निरनिराळ्या ठिकाणी चालकत्वाचा बोजा एकदोघांवर पडतो आणि बाकीचे सर्व डाराडूर झोपा घेतात. आपण हा निरुत्साह, हे आलस्य यांचा गठ्ठा जर अजूनही समुद्रात बुडवून टाकणार नाही तर आपले राष्ट्र मात्र समुद्रास्तृप्यंतु होईल हे आता आपण ध्यानात धरले पाहिजे. 'Life is not to sleep but to wake' हे सूत्र डोळ्यांसमोर सदैव असून तद्नुसार कृती घडली तरच आता तरणोपाय आहे. अत:पर असे होता कामा नये. एका हंगेरियन कवीने म्हटले आहे, 'Faith is the vision of truth; it is what men live by ; it holds promise of bright days when the brain is singing the Sun will never never shine and the clouds are hanging low.' कार्लाईल असेच म्हणतो :- 'Nation has that within her which the whole world will not conquer.' राष्ट्रे कधीही खच्ची करता येत नाहीत. त्यांचा आत्मा सदैव जिवंत असतो. हे जे तुमच्यामध्ये आहे त्याचे आविष्करण करा; जे गुप्त आहे, जे सुप्त आहे, ते प्रगट करा, ते जागे करा, म्हणजे तुम्हांस कोण दडपू शकेल? हे जागे करण्यासाठीच टिळक झटले. आमच्यांत तेज चमकू लागत आहे असे गोखले सरकारास बजावू लागले. आपण सर्वांनी आता तेज प्रकट केले पाहिजे. तेजाचा झोतच्या झोत उत्पन्न केला पाहिजे. म्हणजे सरकारचे डोळे दिपतील आणि या दिपलेल्या सरकारच्या हातांतील सत्ता जबाबदार अशा लोकनायकांच्या हातांत येईल. आपल्यामध्ये हे तेज येण्सास गोखले, टिळक यांच्यासारख्या नि:स्वार्थी व देशासाठी देहार्पण करणा-या महात्म्यांचे आपण सदैव - ध्यान केले पाहिजे. त्यांची स्फूर्ती शतांशाने आपणात आली तरी  सुध्दा पुरे होईल. परंतु आपण जास्त कार्यक्षम होण्यासाठी आपला पुढा-यांवर विश्वास पाहिजे. मुसलमानांपेक्षा हिंदू - विशेषत: सुशिक्षित हिंदू- अत्यंत साशंकपणे वागतात. त्यांची मने लंबकासारखी असतात. असेच का करावयाचे, तसेच का नाही, त्याचेच का ऐकावयाचे, असले वायफळ प्रश्न काही न करणारे लोक विचारीत असतात. हे विचारांतच मरणारे लोक काहीही करू शकणार नाहीत. आमचा धर्मावर विश्वास नाही, पुढा-यांवर नाही; शंकांवर मात्र विश्वास आहे. असल्या शंकेखोरांपेक्षा विचारास वाव न देणारे बेफाम लोकही अत्यंत श्रेयस्कर होत. एकाने म्हटले आहे की 'Heroism flees and never reasons and therefore is always right' यात जरी अतिशयोक्ती असली तरी येथे जीवन आहे, जिवंतपणा आहे, धडाडी आहे, कर्तृत्व आहे. बिशन नारायण धार यांनी हिंदूच्या या वृत्तीवर एक सुंदर लेख लिहिला होता. ते म्हणतात,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel