त्या उदार पुरुषाचे मूळचे नाव वालजी. वालजी घोडयावर स्वार होऊन परत आपल्या शहरी आला. पोलिस लवकरच आपणास पकडणार ही त्याला खात्रीच होती. सायंकाळ होऊन गेली होती. त्याने आवराआवर केली. उरलेसुरले काम आटोपले. त्याने अंगात एक विशेष जाकीट घातले, त्यावरून आणखी एक अंगरखा घातला. त्यावरून आणखी एक जाड लांब कोट घातला. त्याला दवाखान्यात जाऊन त्या अभागिनीची भेट घ्यायची इच्छा होती. तिची मुलगी आणण्याचे त्याने कबूल केले होते; परंतु अकस्मात हा खटला आला. त्या मुलीकडे जाण्याचे राहिले आणि आता तर ते शक्य नव्हते; परंतु त्या आईला भेटता आले तर पाहावे असे वालजीला सारखे वाटत होते.

त्या अभागिनीचा ज्या पोलिस अधिकार्‍यासमोर त्या दिवशी तो खटला चालला होता. त्या पोलिस अधिकार्‍याने त्याच वेळेस वालजीला ओळखले होते. घसरणार्‍या मालाच्या गाडीला एका खांद्याने वर उचलणारा असा शक्तिमान दुसरा कोण असणार? वालजीच्या शक्तीच्या कथा पोलिसांत पसरलेल्या होत्या. त्याचे फोटोही होते. त्याच वेळेस त्या पोलिस अधिकार्‍याने वालजीस पकडले नाही. वालजी नगराध्यक्ष होतो. तो उदार म्हणून प्रसिध्द होता. सारे लोक त्याला देवाप्रमाणे मानीत. त्याला एकदम अटक करण्याने दंगा झाला असता.

त्या पोलिस अधिकार्‍याने अधिक पोलिस मागवून घेतले आणि आता तर हा वालजी ही शंकाच नव्हती. ते दुसरे पोलिसही इकडे आले. वालजीच्या शहरात आज जिकडेतिकडे पोलिस होते. चव्हाटयाचव्हाटयावर, नाक्यानाक्यावर पोलिस खडे होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel