काही दिवस असे गेले. बळवंतराव आता पूर्ण भ्रमिष्ट झाले. ते एकदम काहीतरी बोलत. जेवायसाठी पाटावर बसत आणि ‘चित्रा, आलो हो. कोण नेतो तुला पळवून, बघू दे.’ असे म्हणून एकदम उठून धावत. काठी घेत. घरातून बाहेर जात. भोजू त्यांना परत घरात आणी.

ते आपल्या खोलीत बसून राहात. भोजू पहारा करी. बळवंतरावांना कधी तो कलेक्टर डोळ्यांसमोर दिसे. ते आपल्या मुठी वळीत. ‘मोठा आला कलेक्टर! थोबाडला असता त्या दिवशी. त्याची मुलगी हरवली असती तर त्याचे नसते का डोके फिरले? आणा रे त्या कलेक्टरला धरून. कानशिलात देतो त्या गाढवाच्या. हा बळवंतराव का नालायक? मग लायक तरी कोण? चित्रा. जगा त फक्त चित्रा लायक. कोठे आहे चित्रा? हाका मारते वाटते? भोजू, धाव. चित्राच्या मदतीला धाव. दुष्ट आहे तिची सासू. दुष्ट, फार दुष्ट राक्षसीण आहे. तिनेच चित्राला नाहीसे केले. नाही नाही ते बोलते. बोलू दे.’

‘...ती बघा चित्रा! श्यामू, रामू, दामू आली रे तुमची ताई! हसा. पुसा डोळ्याचे पाणी. चित्रा, कोठे ग लपली होतीस? दाराआड होतीस? कोठे होतीस? आता मी वेडा नाही. कोण म्हणते मी वेडा आहे? मी वेडा, तर शहाणा कोण? चित्रा, चित्रा एक शहाणी. सा-या जगाला ती अक्कल देईल. निष्पाप मन म्हणजेच नाही का अक्कल! सर्वांवर विश्वास म्हणजेच नव्हे का परम ज्ञान? हसता काय? मूर्ख आहात सारी! चित्राला ज्ञान आहे ते तुम्हाला शंभर जन्म तपश्चर्या करूनही मिळणार नाही.’

‘भोजू, भोजू रे! कोठे आहे भोजू? तू हो सर्वांना. मी वेडा! तू सांभाळ. तू आपले घरदार विकणार? आमच्यासाठी? तू साधा गडी, न शिकलेला आणि असे थोर तुझे मन! चित्रासारखाच तूही ज्ञानी आहेस.’

...त्या कलेक्टरला जा शिकव. दे दोन थोबाडीत त्या लेकाच्या. कलेक्टरची खुर्ची मिळाली म्हणजे का अक्कला येते? सहानुभूतीने ज्ञान मिळते. नम्रपणाने ज्ञान मिळते.’

अशी बळवंतरावांची बडबड अखंड चालू असायची. कधीकधी मुके बसले                                                                                                                                                                                                                                                                                                      की अखंड मौन. एक शब्द मग बोलत नसत.

‘आई माझ्या मनात येते ते सांगू?’ भोजूने सीताबाईंस विचारले.

‘काय भोजू?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel