अबाबाबा बायको मोठी । घेतले मुसळ लागली पाठीं ॥ १ ॥

अग बायको नको मारूं । तुझें वासरू नेतूं चारूं ॥ २ ॥

बायकोनें दादला गरवार केला । मनाचा मनोरथ पूर्ण झाला ॥ ३ ॥

एका जनार्दनीं हुडा । साही शास्त्रांचा केला चुराडा ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel