स्वर्ग मृत्यु पाताळ त्याचा मंडप घातिला वो । चार वेदांचा फुलवरा बांधिला वो । शास्त्रें पुराणें अनुवादिती तुझा गोंधळ मांडिला वो ॥ १ ॥

उदो बोल उदो बोल कृष्णाबाई माउलीचा वो ॥ध्रु०॥

जीवशिव संबळ घेउनी आनंदें नाचती वो । अठ्यांयशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो । तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥ २ ॥

आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो । पुंडलीक दिवटा शोभे वाळुवंटी वो । एका जनार्दनीं अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel