जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार । सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की जी मायबाप ॥ १ ॥

जिवाजीनें सारा गांव । बुडविण्याची धरली हांव । त्यासी मिळाले कामाजीराव । मग अन्याय सहजचि की० ॥ २ ॥

कामाजी बाजीस मिळाले । क्रोधाजी गांवांत सहज शिरले । लोभाजीचें ठाणें जोडले । मग विसरले धन्यासी की० ॥ ३ ॥

मदाजी बाजी तों जाहलें मस्त । त्यांनी गांव पांगविला दरोबस्त । मत्सर बावा उन्मत्त । आपआपणांत मिळाले की० ॥ ४ ॥

दंभाजी म्हणविती चौधरी । सदा बैसती आपुले घरीं । धन्याची तलब आलियावरी । गांडीवरी टोले की० ॥ ५ ॥

अहंकार पोतनीस कारभारी । ते जिवाजीस ठेविती धाब्यावरी । त्याची भरोवरी । कोण करील की० ॥ ६ ॥

याची नका धरूं संगती । तेणें तुमची न चुके पुनरावृत्ती । एका जनार्दनीं करी विनंती । संतीं ऐकावें की जी मायबाप ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel