जोहार मायबाप जोहार । मी तो एकनाथ महार । लहानसा महाराचा पोर ।

माझे बोलण्याचा विचार । दुसरा नाहीं की जी मायबाप ॥ १ ॥

माझ्या बोला ऐकिजे । मोठेमोठे उमराव राजे ।

तुम्हीच का जिवाजी न जाणिजे ।

वेळेस संदेह धरितां की० ॥ २ ॥

चैतन्य चावडीचा महार । कीं जी मिराशी महार ।

जेव्हां नव्हता गांवचा आवार ।

मज ओळख नाहीं की० ॥ ३ ॥

कायापूरचा अचाट पाया । मनाजी संगें मिळाले खाया ।

परि नाहीं वाट की० ॥ ४ ॥

दहा गुरें बाहेर दिसती । पांच गुरें अंतर असती ।

इतुकीं आवरीं अवचिती । नाहीं तरी खोडा पडसी की० ॥ ५ ॥

बाराजणें फुगवितील गाल । शेवटीं तुम्हीच बांधिले जाल ।

तुमचे होतील बेताल । तेव्हां तुम्हांस कोण सोडवील की० ॥ ६ ॥

सारे कडेचे पोहणार । दहा आणि पांच पोर ।

एकनाथ करितो जोहार । अक्कल धरा की जी मायबाप ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel