अध्याय १७ वा
सतरावा अध्यायहि परिशिष्टरूप आहे. यज्ञ, दान व तप या तीन गोष्टी येथें सांगितल्या आहेत. गीतेत यज्ञधर्मांचे महान् तत्व आहे. गीतेंतील यज्ञ या शब्दाचा अर्थ काय? यज्ञ म्हणजे झीज भरून काढणें. तिस-या अध्यायांत

“सहयज्ञा: प्रजा: सृष्टवा पुरोवाच प्रजापति:
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्ति्वष्ट कामधुक्”

असा सुंदर श्लोक आहे. सृष्टि निर्माण करणा-यानें मनुष्याला एकटें नाही निर्मिले. त्याच्याबरोबर यज्ञहि निर्माण केला. यज्ञ निर्माण करून प्रभु म्हणाला “या यज्ञाची उपासना करा. हा यज्ञ हीच तुमची कामधेनु. त्या तिस-या अध्यायांत पुढें म्हटलें आहे की “तुम्ही देवासाठी यज्ञ करा. देव तुमच्यासाठी पास पाडतील.” याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की एकमेकांनी झीज भरून काढावी. देव म्हणजे स्वर्गांत राहणारे. ते स्वर्गांतील देव कोठे असतील ते असोत. परंतु या भूतलावर जे मोठमोठ्या बंगल्यांतून राहतात ते देव आपण पाहतों. या देवांना शेतकरी, कामगार हविर्भाग नेऊन देतात. परंतु देवांनाहि या सेतकरी, कामगारांना भरपूर दिलें पाहिजे. थेंबथेंब भिका-यासारखें देऊं नये, तर पाऊस पाडावा. तरच शेतक-याकामक-यांची झीज भरून येईल. सर्व सृष्टीत हे यज्ञतत्त्व भरून राहिले आहे. नद्या आटतात व मेघांना सजल करतात. परंतु मेघ पुन्हां त्या कोरड्या झालेल्या नद्यांना भरून काढण्यासाठी रिते होतात. असें हें चक्र आहे. तुझी झीज मी भरून काढतों, माझी तूं भरून काढ. रामराम असें आपण एकमेकांना म्हणतों. तूं राम न मीहि राम. ‘देवो भूत्वा देवं यजेत्’ तूंदेव व मीहि देव. एकमेकांना सांभाळूं या. प्रेमाने देऊंया. असा हा यज्ञधर्म आहे.

शेतकरी शेतांत पीक घेतो. शेताचा कस गेला, शेताची झीज झाली. ती झीज भरून काढण्यासाठी तो शेतकरी खत घालतो. झीज भरून काढतो. याला यज्ञ म्हणतात.

आपला देह सेवेंत श्रमला, त्याची झीज भरून काढण्यासाठी देहाला घांस देणे म्हणजे यज्ञकर्म आहे. तें उदरभरण नाही. देह सेवेत राबला. त्याची झीज भरून येण्यासाठी झोप हवी. दमलेलल्या कर्मयोग्याची ती निद्रा म्हणजे पवित्र यज्ञकर्म होय.

बायका चूल सारवून ठेवतात. मलिन भांडी स्वच्छ करतात. खळलेली जमीन सारवतात. घामट कपडे धुतातच हें सारे यज्ञकर्मं आहे.

सृष्टीत हा यज्ञकर्मं नीट चालेल तर आनंद नांदेल. आज जगांत दु:ख आहे; कारण यज्ञोपासना नाही. इंग्लडनें हिंदुस्थानला लुटावे फक्त स्वत: गलेलठ्ठ व्हावें. हिंदुस्थानची झीज कशी भरून येणार ?  ??? हे असे अयज्ञीय प्रकार आज चालले आहेत. आपल्या देशांत आपणहि तेंच पाप करीत आहोंत. जमीनदार, खोत, कारखानदार, खाणीमालक शोतक-याकामक-याची झीज भरून यावी, त्यांना आनंद विश्रांती मिळावी म्हणून कांही करीत आहेत का?

गीता सांगते, एकमेकांची झीज भरून काढा. यज्ञधर्माचे उपासक व्हा. वास्तविक यज्ञधर्म नीट आचराल तर तुमच्याजवळ संचय होणार नाही. परंतु संचय झालाच तर तो देऊन टाका. समाजांतील विषमतेचे खळगे भरून काढण्यासाठी तुमचे साठे-संचय घेऊन या. वेदांतील  ऋषि म्हणतो:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel