ताई : त्याला पाजलेंहि नाहीं, नीट पाहिलेंहि नाहीं. आईनें नेलें.

आई : ने लौकर. बोलायची वेळ नाहीं.

दुसरा : मांजरें बाहेर भांडत आहेत !

आई : मुलाचें रडणें ऐकूं जाणार नाहीं.

दुसरा : चल रे.

आई : सावधपणें जा. काळोख आहेच. सावासारखे जा. चोरासारखे जाऊं नका. मी दार लावून घेतें.

पहिला : कठीण काम !

दुसरा : ही सनातन संस्कृति !

पहिला : तिचीं फळें देवाच्या चरणीं वाहूं.

दुसरा : सनातन संस्कृति देवासाठींच आहे. मानवासाठीं नाहीं.

पहिला : मुकाट्यानें चला.

दुसरा
: कोण आहे तें ? आपल्यापाठीमागून कोणी येत का आहे ?

पहिला : कोणी येत नाहीं.

दुसरा : एवढ्या रात्रीं नारोशंकरी घंटा कोण वाजवीत आहे ?

पहिला : कोणी देवाचा भक्त! पाप करुन आला असेल व '' पाहि मां '' म्हणत असेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel