पुजारी : आतां आलों तेव्हां.

पोलीस
: जिवंत आहे ?

पुजारी
: हो, अजून डोळे नीट उघडीत नाही. ताजें आहे.

पोलीस : आता काय कारायचे ?

पुजारी : मी तरी काय सुचवूं ?

पोलीस
: या मुलाला सांभाळावयास आहे का कोणी तयार ?

वसंता : वेदपुरुषा! ते बघ रात्रीचे दोघे मित्र. आपल्या ताईचे मूल तो घेईल का ?

वेदपुरुष : समाज त्याला खाऊन टाकील.

वसंता
: त्याच्या डोळ्यांतून पाणी आलें आहे ओठ थरथरत आहे. कसा पाय उंच करून बघत आहे !

वेदपुरुष
: त्याचा मित्र त्याला पाठीमागे खेंचीत आहे, पुढे घुसूं देत नाही .

पोलीस
: आहे कोणी तयार ? कोणी हिंदु आहे तयार ?

पुजारी
: असली बिनवारशी मुलें हिंदु धर्म पोटाशी घेणार नाही ; हिंदु धर्म अस्सलाला किंमत देतो. नकली माल हिंदु संस्कृतीस खपत नाहीं.

एकजण
: हिंदुची संख्या घटत आहे म्हणून मात्र घंटा वाजवतां! अशी लाखो बेवारशी मुलें ख्रिस्ती व मुसलमान जवळ घेतात व म्हणून त्यांची संख्या वाढते .

दुसरा : अहा शिष्ट, वाटेल तें नका बोलू. मुसलमान फसवून पळवून बाटवतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel