एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. कुत्रा म्हणाला, 'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.'
यावर कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे. तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.'
तात्पर्य
- देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.