एक धनगर समुद्राकाठी बसून मेंढ्या चारीत असता समुद्र पाहून फार मोहीत झाला. तेव्हा समुद्र अगदी शांत होता व त्यावर गलबते फिरत होती. ते पाहून आपणही समुद्रात व्यापार करावा असे त्यास वाटले व त्याने मेंढ्या विकून एक गलबत विकत घेतले व तो माल भरून व्यापारास निघाला. परंतु वाटेत मोठे वादळ झाले व त्यामुळे गलबत बुडू नये म्हणून सगळा माल त्याला समुद्रात फेकून द्यावा लागला. शेवटी त्याचे जहाज एक खडकावर आपटून फुटले व तो कसाबसा वाचला.
यानंतर त्याने ज्या माणसाला आपल्या मेंढ्या विकल्या होत्या, त्याच्याकडे तो मेंढ्या राखण्यासाठी चाकरी करू लागला. असाच एकदा पुन्हा तो समुद्रकाठी आला असता समुद्राकडे बघून म्हणाला.
'आता काही मी तुला भुलणार नाही. तुझं स्वरूप मला चांगलं समजलं आहे.'
तात्पर्य
- ज्याने आपल्याला एकदा फसविले त्याचा पुन्हा विश्वास धरणे धोक्याचे आहे. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.