एका शेतकर्‍याने साळुंकी व एक कवडा असे दोन पक्षी विकत आणले. साळुंकीला गाणे ऐकण्यासाठी आणि कवडा मारून खाण्यासाठी. त्याची बायको कवड्याची कढी करण्यासाठी पक्षी ठेवले होते तेथे गेली. परंतु अंधारात चुकून तिने कवड्याऐवजी साळुंकीलाच घेतले आणि आता तिची मान सुरीने कापणार इतक्यात त्या साळुंकीने गाणे सुरू केले व त्यामुळे तिचा प्राण वाचला.

तात्पर्य

- पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय एखाद्याचा जिव घेणे पाप आहे. कारण ज्याला मारावयाचे त्याला सोडून आपण भलत्यालाच मारल्याचे नंतर लक्षात आल्यास ती चूक दुरुस्त करता येत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel