एका बाईचा नवरा खूप दारू प्यायचा. त्याला दारू सोडण्याविषयी तिने खूप वेळा विनवले. परंतु काही उपयोग झाला नाही. मग एकदा दारू पिऊन बेशुद्ध पडलेला असताना तिने त्याला स्मशानात नेऊन एका खड्ड्यात ठेवले व स्वतः भुताचे सोंग घेऊन तो शुद्धीवर येण्याची वाट पहात बसली.
काही वेळाने त्याची नशा उतरल्यावर तो इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा त्याच्यापुढे खाण्याचा पदार्थ ठेवून ती भूताच्या आवाजात म्हणाली, 'ऊठ, हे अन्न खा ! मेलेल्या लोकांना अन्न देण्याचं काम मी करतो !'
ते ऐकून तिचा नवरा म्हणाला, 'माझ्या स्वभावाची तुला नीट ओळख झालेली दिसत नाही. कारण असं असतं तर तू मला हे अन्न न देता प्यायला थोडी दारू दिली असतीस !'
तात्पर्य
- व्यसनी मनुष्याचे व्यसन सुटणे अशक्यच. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.