एकदा एका रोग्याच्या घरी जाऊन एक वैद्य म्हणाला, 'काय हो, आज कसं काय वाटतं आहे?'

रोगी म्हणाला, 'आज मला फारच चांगल वाटतं आहे.'

वैद्य म्हणाला, 'हे तर उत्तम चिन्ह.'

दुसर्‍या दिवशी त्याने तोच प्रश्न विचारला तेव्हा रोगी म्हणाला, 'माझ्या अंगात आज कापरं भरलं आहे. तेव्हा वैद्य म्हणाला 'हे लक्षण तर फारच चांगलं.'

यानंतर त्या रोग्याचे काही मित्र त्याच्याकडे भेटायला गेले व त्यांनी त्याला तब्येतीविषयी विचारले. तेव्हा तो म्हणाला, 'माझ्यासंबंधीची इतकी चांगली लक्षणं वैद्यबुवांस दिसू लागली आहेत की, त्यावरून मी आता काही फार दिवस जगणार नाही असं वाटतं !'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel