पाणबुडा नावाचा पक्षी पाण्यात उड्या मारून मासे पकडून खातो. एका पाणबुड्याने आपण पारध्याच्या हाती सापडू नये म्हणून आपले घरटे नदीकाठच्या झाडावर बांधले होते. एके दिवशी तो पक्षी बाहेर गेला असता नदीला पूर आला आणि पाणि चढून घरटे पिलांसकट वाहून गेले. परत आल्यावर पक्षी पाहातो तर घरटे व पिले दोन्ही नाहीशी झालेली. ते पाहून तो म्हणाला, "एका शत्रूला वाचविण्यासाठी मी येथे येऊन राहिलो, तोच दुसर्‍या शत्रूच्या तडाख्यात सापडलो."

तात्पर्य

- एका संकटातून सुटण्याच्या प्रयत्‍नात कधी दुसरेच संकट उभे राहाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel