एका मोलकरणीकडे एक कोंबडी होती. ती दररोज एक अंडे देत असे आणि त्याच्यावर मोलकरणीचा उदरनिर्वाह चांगला चालत असे.
एक दिवस तिला वाटले की, या कोंबडीला जर आपण दुप्पट खाऊ घातले तर ती दोन अंडी देईल व आपल्याला दुप्पट पैसे मिळतील. म्हणून ती कोंबडीला दुप्पट खाऊ घालू लागली. हळूहळू कोंबडी लठ्ठ होऊ लागली व ती मुळीच अंडी घालेनाशी झाली.
तात्पर्य
- होत असणारा लाभही अति हावरटपणाने नाहीसा होता. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.