कशी आली गे वैरीण होळी, जीव तळमळी । पती येतिल कोणे काळी ? ॥धृ०॥

सण शिमगा मोहरे आला कसा राहीला । कांहीं करुणा नये सयाला । कोणे सवतीने फितवीला । जवळ बसवीला । अन्नपाणी भावेना मजला । आतां घरोघर सखया रंग करिती । आपुलाल्या स्वामींसी खेळती । चुवाचंदन चर्चिती । डोलती तिच्या अंगणीं केळी-नारळी । गळ्यांत फुलांच्या माळी ॥१॥

येक नेसली पातळ, दुसरी केवळ, तिसरी ल्याली काजळ । चवथिच्या गळ्यामधिं हार रूप सांवलें । पांचवी बहू वेल्हाळ । सहावीनें घागरी भरिल्या । सातवीनं झार्‍या दिल्ह्या । त्या अवघ्या मिळोनी चालिल्या दिली आरोळी । खेळतो जसा वनमाळी ॥२॥

लागली तुकनचे चरणीं कर जोडुनी । पती येतां देखिलें नयनीं । सये अनंद जाला मनीं, ऐक साजणी । सुखदु:ख गेलें विसरूनी । बोले धर्मा खेळतो शिमगा । डोलत्यें आपले जागां । मानाजी संतु भोगा ॥ लक्षुमण कहे डोल है । दगा अखर काळीं । हरी नाम वाजवा टाळी ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel