''एकनाथ, फार मोठा काटा पायात मोडला गडया. पाय फार दुखतोय,'' मी म्हटले. '' घरी गेलो म्हणजे काढीन हो'' तो म्हणाला.

सखाराम व एकनाथ ह्या दोघांच्या खांदयावर हात इेवून, मी एका पायाने जात होतो.द असे किती वेळ चालणार? शेवटीमी लंगडत निघालो.

''आता तुम्ही सारे माझ्या गावी चला, जेवा आणि मग पुढे जा,'' एकनाथ म्हणाला.'' गाडीला उशीर होईल,'' गोविंदा म्हणाला. '' तुम्हांला बैलगाडी देऊ नि अगदी वेळेवर पोचवू'' एकनाथ म्हणाला. ''चल रे गोविंद,'' मी म्हटले.

एकनाथच्या घरी जायला मी उत्सुक होतो. ज्याने औंधला मला एवढा मोइा आधार दिला, त्याचे घर नको का पाहायला? त्याच्या वडिलांच्या पाया नको का पडायला एकनाथच्या वडिलांचे माझ्यावर फार प्रेम होते. औंधला त्यांची माझी भेटच अशा वेळेस झाली, की ती विसरणे शक्य नव्हते. त्या दिवशी सायंकाळी मी झ-यावरुन स्नान करुन येत होतो. रामनाम जपत होतो. एकनाथ व त्याचे वडील फिरायला निघाले होते. '' काय श्याम झालं स्नान?'' एकनाथने विचारले. '' हो,'' मी म्हटले. '' हे माझे वडी, बरं का,'' एकनाथने ओळख करुन दिली. मी त्यांना नमस्कार केला. ते गेले. मी खोलीत आलो. ते औंधला आले म्हणजे मला भेटत. 'आमच्या मुलाबरोबर तुम्ही जेवत जा. संकोच नका करु,' असे ते सांगत. असे ते एकनाथचे वडभ्ल. काय त्यांचा माझा संबंध? परंतु मनोमय संबंध काहीतरी होता खरा.

गेविंदा आजपर्यंत ब्राम्हणेतराकडे कधी जेवला नव्हता. एकनाथ जातीने गुरव; परंतु माझ्यापुढे गोविंदाचे काय चालणार? गोविंदाने शेवटी येण्याचे कबूल केले. आमच्या जेवणाची ताबडतोब तयारी सुरु झाली. सारे एकनाथच्या घरी आलो. त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला.

''श्याम, तुझा आधी काटा काढतो,चल,'' एकनाथ म्हणाला.
एकनाथ  काटा काढू लागला. मला लहान मुलासारखे रडू येऊ लागले. काटा फारच खोल गेला होता. एकनाथने पाय घट्ट धरुन ठेवला होता. सुईने पाय पोखरण्याचे काम त्याने धीमपणे चालवले होते.

'' नको, नको. राहू दे.'' मी म्हटले.

सुईचा धक्का काटयाला एकदम लागल्यामुळे मी कळवळलो. मला घाम सुटला.

''अरे निघाला आता. एक कळ सोस. एकच,हं,'' असे म्हणून एकनाथने जोराने टाका घेतला. काटा वर आला. त्या वेळेस किती हलके वाटले. पायावर त्याने गूळ-चुना लावला. नंतर आम्ही जेवायला बसलो. दहीभात पोटभर जेवलो.

''श्यामला भातच वाढा. भाकरी खाऊन कंटाळला आहे तो अगदी,'' एकनाथ म्हणाला.

''आता कोकणातच जायचं आहे. भाताच्या अगदी माहेरघरी,'' मी म्हटले.
'' पुन्हा ये बरं, श्याम. प्लेग संपून शाळा सुरु झाली, की तुला मी कळवीनच,'' एकनाथ म्हणाला.

मी' नको नको' म्हणत होतो, तरी एकनाथ दही वाढतच होतो. ते दही नव्हते. त्याच्या हदयातले ते प्रेम होते. ते प्रेम ओतायला दह्याचे बाहयचिन्ह मिळाले झाले. आमची जेवणे झाली. बंडू स्टेशनवर परभारा बैलगाडीबराबर गेला होता. त्याच्यासाठी आम्ही फराळाचे घेतले. एकनाथने आपली बैलगाडी जोडली. त्याच्या वडिलांच्या आम्ही पाया पडलो. सर्वांचा निरोप घेऊन निघालो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel