“थोडे म्हणून दाखवता का?”

“आपली आज्ञा असेल तर म्हणतो.”

पशुपतींच्या आज्ञेने जगन्नाथने एक पद म्हटले.

घुंगटका पट खोल
तूंते राम मिलेगा।। घुंगटका.।।

हे गाणे त्याने म्हटले आणि पशुपतींची मुलगी कावेरी जवळ येऊन ऐकायला बसली. पशुपति प्रसन्न झाले.

“तुमची तर चांगलीच तयारी आहे.” ते म्हणाले.

“बाबा, कसा आहे यांचा गोड आवाज!”

“तुम्ही उतरलांत कोठे?”

“एका खाणावळीत ठेवले आहे सामान.”

“आमच्या येथे राहिलेत तरी चालेल. विद्यार्थी असे मधूनमधून येथे राहतात. पूर्वीची पद्धत आमच्याकडे अद्याप सुरू आहे. या सामान घेऊन, ही माझी मुलगी कावेरी. ही स्त्रियांचा हिंदी वर्ग चालविते. हिंदीमध्ये ही चांगले लिहितेहि.”

“आमचे मराठीहि यांना मग समजेल.”

इतक्यांत कावेरीला कोणी बोलावलें म्हणून ती उठून गेली.

“माझी ही आवडती मुलगी आहे. लहानपणींच तिचा पति वारला. बालविधवा आहे बिचारी! तिला पाहून हृदयाचे पाणी पाणी होते.”

“तुमच्याकडे अद्याप बालविवाह आहे?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel