पाली भाषेत :-

[४. कसिभारद्वाजसुत्तं]


एवं मे सुत्तं। एकं समयं भगवा मगधेसु विहरति दक्खिणागिरीस्मिं एकनाळायं ब्राह्मणगामे। तेन खो पन समयेन कसिभार-द्वाजस्स ब्राह्मणस्स पञ्चमत्तामि नङ्गलसतानि पयुत्तानि होन्ति वप्पकाले। अथ खो भगवा पुब्बण्हसमयं निवासेत्वा पत्तचीवरमादाय येन कसिभारद्वाजस्स ब्राह्मणस्स कम्मन्तो तेनुपसंकमि। तेन खो पन समयेन कसिभारद्वाजस्स ब्राह्मणस्स परिवेसना वत्तति। अथ खो भगवा येन परिवेसना तेनुपसंकमि उपसंकमित्वा एकमन्तं अट्ठासि। अद्दसा खो कसिभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं पिण्डाय ठितं। दिस्वान भगवन्तं एतदवोच-अहं खो समण कसामि च वपामि च, कसित्वा च वपित्वा च भुञ्ञामि; त्वंऽपि समण कसस्सु च वपस्सु च, कसित्वा च वपित्वा च भुञ्ञस्सू ति। अहंऽपि खो ब्राह्मण कसामि च वपामि च, कसित्वा च वपित्वा च भुञ्ञामी ति। न खो पन मयं पस्साम भोतो गोतमस्स युगं वा नंगलं वा फालं वा पाचनं वा बलिवद्दे वा; अथ च पन भवं गोतमो आह-अहं पि खो ब्राह्मण कसामि च वपामि च, कसित्वा च वपित्वा च भुञ्जामी ति। अथ खो कसिभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं गाथाय अज्झभासि—

७६ कस्सको पटिजानासि न च पस्साम ते कसिं।
कसिं नो पुच्छितो ब्रूहि यथा जानेमु ते कसिं।।१।।

७७ सद्धा बीजं तपो वुट्ठि पञ्ञा मे युगनंगलं।
हिरि ईसा मनो योत्तं सति मे फालपाचनं।।२।।

मराठीत अनुवाद :-
[४. कसिभारद्वाजसुत्त]

असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् मगध देशांतील दक्षिणगिरी प्रान्तांत एकनाळा नावांच्या ब्राह्मण-ग्रामांत राहत होता. त्या काळीं कृषिभारद्वाज-ब्राह्मणांच्या शेतांत पेरणीच्या वेळीं पांचशें नांगर चालू होते. तेव्हा भगवान् सकाळच्या प्रहरीं वस्त्र परिधान करून पात्रचीवर घेऊन कृषिभारद्वाज-ब्राह्मणाच्या (शेतीचें) काम चालूं होतें तेथें गेला. तेथें कृषिभारद्वाज-ब्राह्मणाच्या (भोजनसमारंभांतील पंक्तीचें) वाढप (परिवेसना) चालूं होतें. तिकडे जाऊन भगवान् एका बाजूस उभा राहिला. कृषिभारद्वाज-ब्राह्मणानें भिक्षेसाठीं उभा राहिलेल्या भगवंताला पाहिलें. पाहून तो भगवंताला म्हणाला, ‘हे श्रमणा, मी नांगरतों आणि पेरतों; नांगरून आणि पेरून माझा निर्वाह करतों. तूंहि, हे श्रमणा, नांगर व पेर. नांगरून व पेरून तुझा निर्वाह कर.” “हे ब्राह्मणा, मी देखील नांगरतों व पेरतों; नांगरून व पेरून माझा निर्वाह करतों.” पण भगवान् गोतमाचें जूं. नांगर, फाळ, चाबूक किंवा बैल कोठें आम्हांस दिसत नाहींत; तरी पण भगवान् गैतम म्हणतो कीं, हे ब्राह्मणा. मी देखील नांगरतों व पेरतों; नांगरून व पेरून माझा निर्वाह करतों.” तदनंतर कृषिभारद्वाज-ब्राह्मण भगवंताला (या) गाथेनें बोलला—

७६. तूं आपणांला शेतकरी म्हणवतोस, पण तुझी शेती आम्हांस दिसत नाहीं. तुझी शेती कोणती हें आम्ही विचारतों तें तूं आम्हांस समजावून सांग. (१)

७७. (भगवान्-) श्रद्धा हें माझें बी, तपश्चर्या वृष्टि, प्रज्ञा जूं आणि नांगर, पापलज्जा इसाड, चित्त दोरी, व स्मृति (जागृति) फाळ आणि चाबूक. (२)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel