पाली भाषेत :-

४६१ यञ्ञे रताहं (भो गोतम) यञ्ञं यिट्ठुकामो।
नाहं पजानामि अनुसासतु मं भवं। यत्थ हुतं इज्झते ब्रूहि मे तं।।७।।
तेन हि त्वं ब्राह्मण ओदहस्सु सोतं, धम्मं ते देसेस मि—

४६२ मा जातिं पुच्छ चरणं च पुच्छ। कट्ठा हवे जायति जातवेदो।
नीचाकुलीनोऽपि मुनी धितीमा। आजानियो होति हिरीनिसेधो।।८।।

४६३ सच्चेन दन्तो दमसा उपेतो। वेदन्तगू वुसितब्रह्मचरियो।
कालेन तम्हि हव्यं पवेच्छे। यो ब्राह्मणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ।।९।।

४६४ ये कामे हित्वा अगहा१(१रो.-अगिहा.) चरन्ति। सुसञ्ञतऽत्ता तसरं व उज्जुं।
कालेन तेसु हव्यं पवेच्छे। यो ब्राह्मणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ।।१०।।

मराठीत अनुवाद :-

४६१. (भारद्वाज-) भो गोतमा, मी यज्ञांत रत आहें. यज्ञ करण्याची माझी इच्छा आहे. पण मी हें जाणत नाहीं कीं-मला भवान् उपदेश करो—कोणत्या पात्रीं दान दिलें असतां तें फलद्रूप होतें तें मला सांग.(७)
असें आहे तर, हे ब्राह्मणा, लक्ष दे. मी तुला धर्मोपदेश करतों-

४६२. तूं जन्माविषयीं विचारू नकोस, आचरण विचार. कारण काष्ठापासूनहि अग्नि होतो. आणि नीच कुळांत जन्मलेलाही धैर्यशाली, समंजस आणि पापाची लाज बाळगणारा असा मुनि होतो.(८)

४६३. जो ब्राह्मण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करतो त्यानें, सत्यानें दान्त, दमानें युक्त, वेदान्तपारग व ब्रह्मचर्य पूर्णत्वाला नेणारा अशाला योग्य वेळीं हव्य द्यावें.(९)

४६४. जो ब्राह्मण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करतो त्यानें, जे सरळ धोट्याप्रमाणें वागणारे सुसंयतात्मा कामोपभोग सोडून गृहरहित होतात, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें.(१०)

पाली भाषेत :-

४६५ ये वीतरागा सुसमाहितिन्द्रिया। चन्दो व राहुगहणो पमुत्ता।
कालेन तेसु हव्यं पवेच्छे। यो ब्राह्मणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ।।११।।

४६६ असज्जमाना विचरन्ति लोके। सदा सता हित्वा ममायितानि।
कालेन तेसु हव्यं पवेच्छे। यो ब्राह्मणो पुञ्ञऽपेक्खो यजेथ।।१२।।

४६७ यो कामे हित्वा अभिभुय्य चारी। यो वेदि जातिमरणस्स अन्तं।
परिनिब्बुतो उदकपहदो व सीतो। तथागतो अरहति पूरळासं।।१३।।

४६८ समो समेहि विसमेहि दूरे। तथागतो होति अनन्तपञ्ञो।
अनूपलित्तो इध वा हुरं वा। तथागतो अरहति पूरळासं।।१४।।

मराठीत अनुवाद :-

४६५ जो ब्राह्मण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करतो त्यानें, जसा चन्द्र राहु-ग्रहणापासून मुक्त तसे जे रागापासून मुक्त व सुसमाहितेन्द्रिय आहेत, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें.(११)

४६६ जो ब्राह्मण पुण्याच्या अपेक्षेनें यज्ञ करतो त्यानें, जे समृतिमान्, ममत्व सोडून व अनासक्त होऊन या जगांत हिंडतात, त्यांना योग्य वेळीं हव्य द्यावें.(१२)

४६७ जो कामोपभोग सोडून त्यावर मात करून हिंडतो, ज्यानें जन्ममरणांचा अन्त जाणला, जो थंडगार जलाशयाप्रमाणें शांत आहे, असा तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(१३)

४६८ तथागत सम मार्गानें चालणार्यांशी समत्वानें वागतो, पण विषम मार्गाने चालणार्यापासून दूर राहतो; त्याच्या प्रज्ञेला पार नाहीं. व तो इंहलोकी व परलोकीं बद्ध होत नाहीं. असा तथागत पुरोडाश देण्याला योग्य होय.(१४)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel