पाली भाषेत :-
१८९ इङ्घ अञ्ञेऽपि पुच्छस्सु पुथू समणब्राह्मणे।
यदि सच्चा दमा१ (१ म.-धम्म.) चागा खन्त्या भिय्यो२ (२ म.-यो.) घ विज्जती।।९।।
१९० कथं नु दानि पुच्छेय्यं पुथू समणब्राह्मणे।
सोऽहं अज्ज पजानामि यो३ (३. म.-सो.) चऽत्थो४ (४ रो.-अत्थो.) संपरायिको।।१०।।
१९१ अत्थाय वत मे बुद्धो वासायाळविमागमा।
सोऽहं अज्ज पजानामि यत्थ दिन्नं महप्फलं।।११।।
१९२ सो अहं विचरिस्सामि गामा गामं पुरा पुरं।
नमस्समानो संबुद्धं धम्मस्स च सुधम्मतं ति।।१२।।
मराठीत अनुवाद :-
१८९. पाहिजे तर निरनिराळ्या श्रमणब्राह्मणांना सत्य, दम१, (१ ‘धर्म’ असाही पाठ ब्रह्मी पुस्तकांतून आहे.) त्याग आणि क्षान्ति यांच्यापेक्षा श्रेष्ठ इहलोकीं कांहीं आहे काय हें विचार. (९)
१९०. (आळवक-) आतां मी निरनिराळ्या श्रमण-ब्राह्मणांना कशाला विचारूं? कां कीं, आज मला पारलौकिक लाभ म्हणून जो आहे तो समजला.(१०)
१९१. खरोखर माझ्या लाभासाठीं बुद्ध आळवीला राहावयास आला. त्यामुळे मला आज दान कोणाला दिलें असतां विशेष लाभदायक होतें हें समजलें. (११)
१९२. तो मी संबुद्धाला आणि धर्माच्या सुधर्मतेला नमस्कार करीत व गांवोंगांवीं व शहरोंशहरीं फिरत राहीन. (१२)
पाली भाषेत :-
एवं१ (१ -१ ब्रह्मी व रोमन आवृत्तींत नाहीं.) वुत्ते आळवको यक्खो भगवन्तं एतदवोच-अभिक्कन्तं भो गोतम....पे....भिक्खुसंघं च। उपासकं मं भवं गोतमो धारेतु अज्जतग्गे पाणुपेतं सरणं गतं ति१।
आळवकसुत्तं निट्ठितं।
मराठीत अनुवाद :-
त्यावर आळवक यक्ष भगवंताला म्हणाला, “धन्य धन्य, भो गोतम....इत्यादिक.” आजपासून आमरण शरण गेलेला मी उपासक आहें असें भगवान् गोतमानें समजावें.
आळवकसुत्त समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.