पाली भाषेत :-

३१९ यथा नरो आपगं ओतरित्वा। महोदिकं सलिलं सीघसोतं।
सो वुय्हमानो अनुसोतगामी। किं सो परे सक्खति तारयेतुं।।४।।

३२० तथेव धम्मं अविभावयित्वा। बहुस्सुतानं अनिसामयत्थं।
सयं अजानं अवितिण्णकंखो। किं सो परे सक्खति निज्झपेतुं।।५।।

३२१ यथाऽपि नावं दळ्हमारुहित्वा। पियेनऽरित्तेन१(१ अ., म.-फियेन.) समंगिभूतो।
सो तारये तत्थ बहूऽपि अञ्ञे। तत्रूपयञ्ञू२(२., म.-तत्रूपायञ्ञू.) कुसलो मुतीमा३(३ म.-मतीमा.)।।६।|
३२२ एवंऽपि यो वेदगु भावित्तो। बहुस्सुतो होति अवेधधम्मो।
सो खो परे निज्झपये पजानं। सोतावधानूपनिसूपपन्नो।।७।।

मराठीत अनुवाद :-

३१९. ज्याप्रमाणे एकादा मनुष्य पाण्यानें भरलेल्या जोरानें वाहणार्‍या नदींत उतरून प्रवाहाबरोबर वाहत जातो—तो इतरांना कसा तारूं शकेल?—(४)

३२०. त्याप्रमाणेंच जो धर्मज्ञान न संपादतां आणि बहुश्रुतांचें अर्थपूर्ण वचन न ऐकतां स्वत: अज्ञान, साशंक, तो इतरांचें समाधान कसें करील? (५)

३२१. जसा एकादा नौका चालविण्यांत कुशल बुद्धिमान् माणूस वल्हीं, सुकाणूं असलेल्या बळकट नौकेंत बसून तिच्या आधारानें पुष्कळांना तारूं शकेल, (६)

३२२. तसाच विद्वान्, भावितात्मा, बहुश्रुत, अप्रकम्प्य आणि श्रोतावधानानें ज्यानें निर्वाणज्ञान संपादिलें आहे असा ज्ञानी—तोच लोकांचे समाधान करूं शकेल. (७)

पाली भाषेत :-

३२३ तस्मा हवे सप्पुरिसं भजेथ। मेधाविनं चेव बहुस्सुत्तं च।
अञ्ञाय अत्थं पटिपज्जमानो। विञ्ञातधम्मो सो सुखं लभेथा ति।।८।।

नावासुत्तं१(१ अ.-धम्मसुत्तं, नावासुत्तं तिऽपि.) निट्ठितं।

२१
[९. किंसीलसुत्तं]


३२४ किं-सीलो किं-समाचारो कानि कम्मानि ब्रूहयं।
नरो सम्मा निविट्ठस्स उत्तमत्थं च पापुणे।।१।।

मराठीत अनुवाद :-

३२३. म्हणून मेधावी आणि बहुश्रुत अशा सत्पुरुषाची उपासना करावी. त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून त्याप्रमाणें चालणारा धर्म जाणून सुख मिळवील. (८)

नावासुत्त समाप्त

२१
[९. किंसीलसुत्त]


३२४. कोणत्या शीलानें, कोणत्या आचारानें आणि कोणत्या कर्माच्या अभ्यासानें माणूस सन्मार्गानें चालूं शकेल व परमार्थ प्राप्त करून घेईल? (१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel