पाली भाषेतः-

६७६ किच्छा वतायं इध वुत्ति। यं जनो पस्सति किब्बिसकारी।
तस्मा इध जीवितसेसे। किच्चकरो सिया नरो न च मज्जे।।२०।।

६७७ ते गणिता विदूहि तिलवाहा। ये पदुमे निरये उपनीता।
नहुतानि हि कोटियो पञ्च भवन्ति। द्वादस कोटिसतानि पुनऽञ्ञा।।२१।।

६७८ यावदुक्खा निरया इध वुत्ता। तत्थऽपि ताव चिरं वस्तब्बं।
तस्मा सुचिपेसलसाधुगुणेसु। वाचं मनं सततं परिरक्खे ति।।२२।।

कोकालियसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-


६७६ अशा नरकांत वास कठिण, जो कल्मषकारी माणसाला भोगावा लागतो. म्हणून या जगांत शिल्लक असलेलें आयुष्य आहे तोपर्यंत माणसानें आपलें कर्तव्य करावें व बेसावधपणें वागूं नये.(२०)

६७७ पांच कोटी नहुत (दशसहस्त्र) आणि बाराशें कोटी तिळांच्या गाड्यांतील तिळांइतकीं वर्षें पद्मनरकांतील आयुष्य आहे अशी विद्वान् गणना करतात.(२१)

६७८. याप्रमाणें दु:खकारक नरक आहेत आणि त्यांत तितका काळ पडावें लागतें. म्हणून शुद्ध, शीलवान् व सदगुणी जनांविषयी वाचा आणि मन सतत संभाळलें पाहिजे.(२२)

कोकालियसुत्त समाप्त

३७
(११. नालकसुत्तं)


६७९ आनन्दजाते तिदसगणे पतीते१(१ म.-पणीते.)। सक्कच्च इन्दं सुचिवसने च देवे।
दुस्सं गहेत्वा अतिरिव थोमयन्ते। असितो इसि अद्दस दिवाविहारे।।१।।

६८० दिस्वान देवे मुदितमने२(२ म.-पमुदितमने.) उदग्गे। चित्तिं३(३ सी.-वित्तिं.) करित्वा इदं अवोचासि४(४ म.-अवोचा पि.) तत्थ किं देवसंघो अतिरिव कल्यरूपो। दुस्सं गहेत्वा भमयथ५(५ म.-रमयथ.) किं पटिच्च।।२।।

६८१ यदा पि आसि असुरेहि अङ्गमो। जयो सुरानं असुरा पराजिता।
तदाऽपि नेतादिसो लोमहंसनो। किं अब्भुतं दट्ठु मरू पमोदिता।।३।।

३७
[११. नालकसुत्त]

६७९ शुद्ध वस्त्रें परिधान करणारे त्रिदशगण देव आनंदित आणि हर्षित होऊन व इन्द्राचा सत्कार करून वस्त्र उडवीत अत्यंत स्तुति करीत असतां त्यांना ‘असित’ ऋषीनें दिवसां बसण्याच्या आपल्या स्थानांतून पाहिलें. (१)

६८० तेव्हां मुदितमन आणि उल्लसित अशा देवांना पाहून तो (ऋषि) आदरपूर्वक म्हणाला—देवसंघ अत्यंत हर्षित कां? हें वस्त्र घेऊन तुम्ही (डोक्याभोवती) कां फिरवितां?(२)

६८१. जेव्हां तुमचें असुरांबरोबर युद्ध झालें, व सुरांचा जय आणि असुरांचा पराजय झाला, तेव्हांही तुम्ही इतके हर्षित झालां नाहीं. आज कोणती अद्भुत गोष्ट पाहून, देवहो, तुम्ही आनंदित झालांत?(३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel