पाली भाषेत :-
११० अतीतयोब्बनो पोसो आनेति तिंबरुत्थनिं।
तस्सा इस्सा न सुपति तं पराभवतो मुखं।।२०।।
१११ इति हेतं विजानाम दसमो सो पराभवो।
एकादसमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।२१।।
११२ इत्थिं सोण्डिं विकिरणिं पुरिसं वाऽपि तादिसं।
इस्सरियस्मिं ठापेति तं पराभवतो मुखं।।२२।।
११३ इति हेतं विजानाम एकादसमो सो पराभवो।
द्वादसमं भगवा ब्रूहि किं पराभवतो मुखं।।२३।।
११४ अप्पभोगो महातण्हो खत्तिये जायते कुले।
सोध रज्जं पत्थयति तं पराभवतो मुखं।।२४।।
११५ एते पराभवे लोके पण्डितो समवेक्खिय।
अरियो दस्सनसंपन्नो स लोकं भजते सिवंति।।२५।।
पराभवसुत्तं निट्ठितं।
मराठीत अनुवाद:-
११०. वयातीत पुरुष तिंबरु वृक्षाच्या फळाप्रमाणें (लहान) स्तन असलेल्या (तरुण) स्त्रीशीं लग्न करतो; व तिच्या ईर्ष्येनें झोंपत नाहीं, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (२०)
१११. हा दहावा पराभव आम्हांस समजला. भगवन्, अकरावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (२१)
११२. व्यसनी आणि उधळ्या स्त्रीला किंवा तशाच पुरुषाला जो अधिकारावर नेमतो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय. (२२)
११३. हा अकरावा पराभव आम्हांस समजला. भगवन्, बारावें पराभवाचें कारण कोणतें तें सांग. (२३)
११४. क्षत्रिय कुलांत जन्मलेला, गरीब पण हांव मोठी असलेला मनुष्य इहलोकीं राज्य मिळविण्याची इच्छा धरतो, तें (त्याच्या) पराभवाचें कारण होय.
११५. शहाणा, तत्त्वज्ञानसंपन्न आर्य हे पराभव बरोबर जाणून कल्याणप्रद लोकीं जातो. (२५)
पराभवसुत्त समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.