पाली भाषेत :-

३१
[५. माघसुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा राजगहे विहरति गिज्झकूटे पब्बते। अथ खो माघो माणवो येन भगवा तेनुपसंकमि। उपसंकमित्वा भगवता सद्धिं सम्मोदि। सम्मोदनीयं कथं साराणीयं वीतिसारेत्वा एकमन्तं निसीदि। एकमन्तं निसिन्नो खो माघो माणवो भगवन्तं एतदवोच-अहं हि भो गोतम दायको दानपति वदञ्ञू याचयोगो, धम्मेन भोगे परियेसामि, धम्मेन भोगे परियेसित्वा धम्मलद्धेहि भोगेहि धम्मधिगतेहि एकस्स पि ददामि, द्विन्नं पि ददामि, तिण्णं पि ददामि, चतुन्नं पि ददामि, पंचन्नं पि ददामि, छन्नं वि ददामि, सत्तन्नं पि ददामि, अट्ठन्नं पि ददामि, नवन्नं पि ददामि, दसन्नं पि ददामि, वीसायऽपि ददामि, तिसायऽपि ददामि, चत्तरीसायऽपि ददामि, पञ्ञासायऽपि ददामि, सतस्सऽपि ददामि, भिय्योऽपि ददामि; कच्चाहं भो गोतम एवं ददन्तो एवं यजन्तो बहुं पुञ्ञं पसवामी ति। तग्घ त्वं माणव एवं ददन्तो एवं यजन्तो बहुं पुञ्ञं पसवसी | यो खो माणव दायको दानपति वदञ्ञू याचयोगो धम्मेन भोगे परियेसति, धम्मेन भोगे परियेसित्वा धम्मलद्धेहि भोगेहि धम्माधिगतेहि एकस्स पि ददाति...पे...सतस्स पि ददाति, भिय्योऽपि ददाति, बहुं सो पुञ्ञं पसवती ति। अथ खो माघो माणवो भगवन्तं गाथाय अज्झभासि—

मराठीत अनुवाद :-

३१
[५. माघसुत्त]


असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् राजगृह येथें गृघ्रकूट पर्वतावर राहत होता. त्या वेळीं माणव (विद्यार्थी) माघ भगवन्तापाशीं आला. येऊन त्यानें भगवन्ताला कुशल प्रश्नादिक विचारले. कुशल प्रश्नादिक संभाषण संपवून तो एका बाजूला बसला. एका बाजूला बसलेला तो माघ माणव भगवन्ताला म्हणाला, “भो गोतमा, मी दायक, दानपति, वदान्य (उदारधी) व याचकप्रिय आहें. मी धर्ममार्गांनें संपत्ति मिळवतों. धर्ममार्गानें संपत्ति मिळवून, त्या धर्ममार्गानें मिळविलेल्या, धर्ममार्गानें उपार्जिलेल्या संपत्तींतून, एकालाही देतों, दोघांनाही देतों, तिघांनाही देतों, चौघांनाही देतों, पांचांनाही देतों, सहांनाही देतों, सातांनाही देतों, आठांनाही देतों, नवांनाही देतों, दहांनाही देतों, विसांनाही देतों, तिसांनाही देतों, चाळीसांनाही देतों, पन्नासांनाही देतों, शंभरांनाही देतों; त्याहून अधिक माणसांनाही देतों. भो गोतमा, याप्रमाणें देत असतां, याप्रमाणें यज्ञ करीत असतां माझें पुण्य पुष्कळ वाढतें काय?” “हे माणवा (विद्यार्थ्या), याप्रमाणें देत असतां, याप्रमाणें यज्ञ करीत असतां,  तुझें पुण्य खात्रीनें वाढत आहे.  हे माणवा, जो दायक, दानपति, वदान्य व याचकप्रिय माणूस धर्ममार्गानें...इत्यादिक...शंभरांनाही देतो, त्याहून जास्त माणसांनाही देतो, त्याचें पुण्य पुष्कळ वाढतें.” त्यावर माघ माणव भगवन्ताला गाथेनें बोलला--
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel