पाली भाषेतः-

६५३ एतमेतं यथाभूतं कम्मं पस्सन्ति पण्डिता।
पटिच्चसमुप्पाददसा१(१ म.- पटिच्चसमुप्पादस्स.) कम्मविपाककोविदा।।६०।।

६५४ कम्मना वत्तती२ लोके कम्मना वत्तती२ पजा।(२ म.-वत्तति.)
कम्मनिबंधना सत्ता रथस्साणीव यायतो।।६१।।

६५५ तपेन ब्रह्मचरियेन संयमेन दमेन च।
एतेन ब्राह्मणो होति एतं ब्राह्मणमुत्तमं३।।६२।।(३ अ.-‘ब्रह्मानं’तिऽपि.)

६५६ तीहि विज्जाहि संपन्नो सन्तो खीणपुनब्भवो।
एवं वासेट्ठ जानाहि ब्रह्मा सक्को विजानतं ति।।६३।।

मराठी अनुवादः-

६५३. प्रतीत्यसमुत्पाद१ (१. हे एक बौद्धतत्त्वज्ञानांतील महत्त्वाचें अंग आहे. स्पष्टीकरणार्थ ‘धर्म आणि संघ’ द्वितीय आवृत्ति पान ४६-४७ पहा.) जाणणारे व कर्मफल जाणण्यांत कुशल पंडित याप्रमाणें यथार्थतया कर्म जाणतात.(६०)

६५४. कर्मानें जग चालतें, प्राणी कर्मानें जगतात. चालणारा रथ जसा अणीवर अवलंबून असतो, तसे प्राणी कर्मबन्धनावर अवलंबून राहतात.(६१)

६५५. तपानें, ब्रह्मचर्यानें, संयमानें आणि दमानें ब्राह्मण होतो. हें ब्राह्मण उत्तम होय.(६२)

६५६. (पूर्वजन्म जाणणें, सद्गति-दुर्गति जाणणें व जन्म-क्षय प्राप्त करून घेणें या) तीन विद्यांनी संपन्न, शान्त व ज्याला पुनर्जन्म नाहीं तो, हे वासेष्ठा, सुज्ञांचा शक आणि ब्रह्मा आहे, असें समज.(६३)

पाली भाषेतः-

एवं वुत्ते वासेट्ठभारद्वाजा माणवा भगवन्तं एतदवोचुं-अभिक्कन्तं भो गोतम...पे...एते मयं भगवन्तं गोतमं सरणं गच्छाम धम्मं च भिक्खुसंघं च, उपासके नो भवं गोतमो धारेतु अज्जतग्गे पाणुपेते सरणं१ गते१ ति।(१-१ रो.-सरणागते.)

वासेट्ठसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-


असें म्हटल्यावर वासेष्ठ आणि भारद्वाज विद्यार्थी भगवन्ताला म्हणाले-धन्य! धन्य! भो गोतमा, इत्यादि. ते आम्ही भगवान् गोतमाला शरण जातों, धर्माला व भिक्षुसंघाला शरण जातों. आम्ही आजपासून आमरण शरण गेलेले उपासक आहोंत, असें भवान् गोतमानें समजावें.

वासेट्ठसुत्त समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel