पाली भाषेत :-

५०
[१२. चूळवियूहसुत्तं]


८७८ सकं सकं दिट्ठिपरिब्बसाना। विग्गय्ह नाना कुसला वदन्ति।
“यो एवं जानाति स वेदि धम्मं। इदं पटिक्कोसमकेवली सो” (१)

मराठीत अनुवाद :-

५०
[१२. चूळवियूहसुत्त]


८७८ आपापल्या सांप्रदायिक मताला धरून व इतरांशीं वाद करून आपापणाला कुशल म्हणवतात व म्हणतात कीं, ‘जो हें मत जाणतो तोच धर्म समजतो व जो या मताला दोष देतो तो अ - केवली (बद्ध) होय.’ (१)

पाली भाषेत :-


८७९ एवंऽपि विग्गय्ह विवादियन्ति। बालो परो अकुसलो ति चाहु।
सच्चो नु वादो कतमो इमेसं। सब्बे व हीमे कुसला वदाना।।२।।

८८० परस्स चे१ धम्ममनानुजानं। बालो मगो२ होति निहीनपञ्ञो।(१ सी-वे.)(२ नि.-मको.)
सब्बे व बाला सुनिहीनपञ्ञा। सब्बे विमे दिट्ठिपरिब्बसाना।।३।।

८८१ सन्दिट्ठिया चे पन वीवदाता३। संसुद्धपञ्ञा कुसला मुतीमा। (३म.-वीवदाना.)
न तेसं कोचि परिहीनपञ्ञो। दिट्ठि४ हि तेसंऽपि तथा समत्ता।।४।। (४ Fsb. दिट्ठि.)

८८२ न चाहमेतं५ तथियं ति ब्रूमि। यमाहु बाला मिथु अञ्ञमञ्ञं। (५ रो.-वाऽहमेतं.)
सकं सकं दिट्ठिमकंसु सच्चं। तस्मा हि बालो ति परं दहन्ति।।५।।

मराठी अनुवाद :-

८७९ या प्रमाणें वाद करून ते विवाद माजवितात, आणि दुसर्‍यांना अकुशल, मूर्ख म्हणतात. हे सगळे आपणाला कुशल म्हणवतात, तेव्हां त्यांच्या वादांत (मतांत) कोणता वाद सत्य होय? (२)

८८० दुसर्‍याचा धर्माला वाव न ठेवणारा जर मूर्ख, पशु आणि हीनबुद्धि ठरतो, तर मग हे स्वत:च्या सांप्रदायिक मतांना धरून चालणारे सर्वच मूर्ख आणि सर्वच दीनबुद्धीचे ठरतात. (३)

८८१ आपलेंच मत उत्तम समजून वाद करणारे विशुद्धबुद्धि, कुशल आणि मतिमान् ठरतात, तर मग, त्यांत - मतांविषयीं वाद करणार्‍यांत - कोणीच हीनबुद्धीचे ठरत नाहींत. कां कीं, तेही इतरांप्रमाणेंच आपापलें मत उत्तम समजतात. (४)

८८२ जें ते परस्परांना मूर्ख म्हणतात, तें तथ्य नव्हे असें मी म्हणतों कारण आपापल्या मतांना ते सत्य समजतात, आणि म्हणून इतरांना मूर्ख ठरवतात. (५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel