पाली भाषेतः-

८४५ येहि विवित्तो विचरेय्य लोके। न तानि उग्गय्ह वदेय्य नागो।
एलंबुज कटक१(१ म.-कण्डकं.) वारिज यथा। जलेन पंकेन चानूपलित्तं।
एवं मुनी सन्तिवादो अगिद्धो। कामे च लोके च अनूपलित्तो।।११।।

८४६ न वेदगू दिट्ठिया२(२ दिट्ठियाको, म., अ.-दिट्ठियायको,) न मुतिया। स मानमेति न हि तम्मयो सो।
न कम्मना नोऽपि सुतेन नेय्यो। अनूपनीतो सो निवेसनेसु।।१२।।

८४७ सञ्ञाविरत्तस्स न सन्ति गन्था। पञ्ञाविमुत्तस्स न सन्ति मोहा।
सञ्ञं च दिट्ठिं च ये अग्गहेसु। ते ३घट्टयन्ता(३ म.-घट्टमाना, घरमाना.) विचरन्ति लोके ति।।१३।।

मागन्दियसुत्तं निट्ठितं।

मराठी अनुवादः-


८४५. ज्या सांप्रदायिक मतांपासून नागानें (निष्पापानें) विविक्त होऊन रहावयास पाहिजे, त्या मतांचा स्वीकार करून त्यानें वादांत पडूं नये. पाण्यांत वाढलेलें कटकनाल कमल जसें पाण्यापासून व चिखलापासून अलिप्त राहतें, त्याप्रमाणें, शान्तिवादी, अलुब्ध मुनि कामोपभोगांपासून आणि जगापासून अलिप्त राहतो.(११)

८४६. वेदपारग (मुनि) दृष्टीमुळें आणि अनुमितीमुळें अहंकार उत्पन्न करीत नाहीं, कारण तो पदार्थांत तन्मय होत नसतो. त्याला कर्मानें आणि श्रुतीनें पकडींत धरून खेंचता येत नाहीं; आणि सांप्रदायिक मतांत आणतां येत नाहीं.(१२)

८४७ संज्ञेपासून विरक्त झालेल्याला ग्रन्थी नाहींत, व प्रज्ञेनें विमुक्त झालेल्याला मोह नाहींत. पण जे संज्ञा आणि दृष्टि पकडतात, ते या जगांत इतरांना धक्के देत फिरतात.(१३)

मागन्दियसुत्त समाप्त

पाली भाषेत :-

४८
[१०. पुराभेदसुत्तं]

८४८ कथंदस्सी कथंसीलो उपसन्तो ति वुच्चति।
तं मे गोतम पब्रूहि पुच्छितो उत्तमं नरं।।१।।

८४९ वीततण्हो पुरा भेदा (ति भगवा) पुब्बमन्तमनिस्सितो।
वेमज्झे नूपसंखेय्यो१(१ म-नुप, न प.) तस्स नत्थि पुरेक्खतं२।।२।।(२ म.-पुरक्खतं.)

८५० अक्कोधनो असन्तासी अविकत्थी अकुक्कुचो३।(३ म.-ञ्चो.)
मन्तभाणी अनुद्धतो स वे वाचायतो मुनि।।३।।

मराठी अनुवादः-

४८
[१०. पुराभेदसुत्त]

८४८ “कोणत्या दर्शनामुळें आणि कोणत्या शीलामुळें (मनुष्य) ‘उपशांत’ म्हटला जातो? हे गोतमा, असा उत्तम माणूस कोणता हें विचारतों, तें मला सांग.”(१)

८४९ शरीरभेदापूर्वी जो वीततृष्ण-असें भगवान् म्हणाला-तो अतीत काळाला चिकटून राहत नाहीं, वर्तमानकाळीं (एकाद्या मर्यादित संज्ञेनें) वर्णिला जात नाहीं, आणि त्याला भविष्यकाळाविषयीं आसक्ति नाहीं. (२)

८५० अक्रोधन, संत्रस्त न होणारा, आपली शेखी न मिरविणारा, कौकृत्य१(१. ९२५ व्या गाथेंतील ह्या शब्दावरील टीप पहा.) नसणारा, विचारपूर्वक बोलणारा व अभ्रान्त, तोच वाचासंयमी मुनि होय.(३)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel