मराठी अनुवादः-
३६
[१०. कोकालिक१सुत्त] (१ मुळांत कोकालिय असा पाठ आहे, पण अट्ठकथेंत कोकालिक असा आढळतो, व तोच येथें (भाषान्तरांत) स्वीकारला आहे.)
असें मी ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत राहत होता. त्या वेळी कोकालिक भिक्षु भगवन्तापाशी आला. येऊन भगवन्ताला वंदन करून एका बाजूला बसला. एका बाजूस बसून कोकालिय भिक्षु भगवन्ताला म्हणाला- भदन्त शारिपुत्र आणि मौद्गल्यायन हे पापेच्छ असून पापी वासनांना वश झाले आहेत. असें म्हटल्यावर भगवान् कोकालिक भिक्षूला म्हणाला-हे कोकालिका, असें म्हणूं नकोस; कोकालिका, शारिपुत्र-मौद्गल्यायनांवर विश्वास ठेव. शारिपुत्र-मौद्गल्यायन सद्गुणी (पेशल) आहेत. दुसर्यांदाही कोकालिक भिक्षू भगवन्ताला म्हणाला- भदन्त, जरी भगवन्तावर माझी श्रद्धा आणि विश्वास आहे, तरी शारिपुत्र व मौद्गल्यायन हे पापेच्छच असून पापी वासनांना वश झाले आहेत. दुसर्यांदाही भगवान् कोकालिक भिक्षूला म्हणाला-हे कोकालिका, असें म्हणूं नकोस, असें म्हणूं नकोस, शारिपुत्र-मौद्गल्यायनांवर विश्वास ठेव. शारिपुत्र-मौद्गल्यायन सद्गुणी आहेत. तिसर्यांदाही कोकालिक भिक्षू भगवन्ताला म्हणाला- भदन्त, जरी भगवन्तावर माझी श्रद्धा आणि विश्वास आहे, तरी शारिपुत्र व मौद्गल्यायन हे पापेच्छच असून पापी वासनांना वश झाले आहेत. तिसर्यांदाही भगवान् कोकालिक भिक्षूला म्हणाला-हे कोकालिका, असें म्हणूं नकोस, असें म्हणूं नकोस; कोकालिका, शारिपुत्र-मौद्गल्यायनांवर विश्वास ठेव, शारिपुत्र-मौद्गल्यायन सद्गुणी आहेत.
तेव्हा कोकालिक भिक्षु आसनावरून उठला, व भगवन्ताला नमस्कार करून व प्रदक्षिणा करून तेथून निघाला. तेथून निघाल्याबरोबर कोकालिक भिक्षूच्या सर्व शरिरावर मोहरीएवढे फोड उठले. ते मोहरीएवढे होऊन मुगाएवढे झाले, मुगाएवढे होऊन वाटाण्याएवढे झाले; वाटाण्याएवढे होऊन बोराच्या बी-एवढे झाले; बोराच्या बीएवढे होऊन बोराएवढे झाले; बोराएवढे होऊन आंवळ्याएवढे झाले; आंवळ्याएवढे होऊन कोंवळ्या बेलफळाएवढे झाले;
कोंवळ्या बेलफळाएवढे होऊन (पिकलेल्या) बेलफळाएवढे झाले, आणि पिकलेल्या बेलफळाएवढे होऊन फुटले. त्यांतून पू, रक्त वाहूं लागलें, आणि त्याच रोगानें कोकालिक भिक्षु मरण पावला. मरण पावल्यावर कोकालिक भिक्षु मनांतील शारिपुत्रमौद्गल्यायनांच्या द्वेषामुळे पद्मनरकांत जन्मला.
तेव्हां रात्र संपत आली असतां, अत्यंत सुन्दर, सहंपति ब्रह्मा सर्व जेतवन प्रकाशित करून, भगवन्तापाशी आला; येऊन भगवन्ताला वंदन करून एका बाजूला उभा राहिला. एका बाजूस उभा राहून सहंपति ब्रह्मा भगवन्ताला म्हणाला-भदन्त, कोकालिक भिक्षु मरण पावला; मरण पावून कोकालिक भिक्षु मनांतील शारिपुत्र-मौद्गल्यायनांच्या द्वेषामुळें पद्मनरकांत जन्मला. असें सहंपति ब्रह्म म्हणाला. असें म्हणून भगवंताला वंदन करून व प्रदक्षिणा करून तेथेंच अन्तर्धान पावला.
तदनंतर रात्र संपल्यावर भगवान् भिक्षूंना म्हणाला-भिक्षूंनो, गेल्या रात्रीं, रात्र संपत आली असतां...इत्यादी...असें सहपति ब्रह्मा म्हणाला. असें म्हणून मला वंदन करून व प्रदक्षिणा करून तेथेंच अन्तर्धान पावला.
असें म्हटल्यावर एक भिक्षु भगवंताला म्हणाला—“भदन्त, किती दीर्घ काळ पद्म नरकांत आयुष्याचें मान असतें?” “हे भिक्षु, पद्म नरकांत आयुष्याचें मान फार मोठें आहे; तें इतकी वर्षे, इतकीं शतकें, इतकीं हजार वर्षे किंवा इतकीं लक्ष वर्षे असें गणना करून सांगणें सोपे नाहीं,” “भदन्त, पण त्या बाबतींत उपमा देणें शक्य आहे काय?’ भगवान् म्हणाला- “हे भिक्षु, तें शक्य आहे. हे भिक्षु, कोसल देशांतील वीस खारी१ (१ चार आढकांचा द्रोण व १६ द्रोणांची एक खार.) तिळांचा गाडा (वाह) असतो व त्यांतून एकादा मनुष्य दर शंभराव्या वर्षाला एक तीळ काढीत राहील तर, या क्रमानें तो कोशल देशांतील वीस खारींचा तिळाचा गाडा लवकर खलास होईल, पण अर्बुद नरकांतील आयुष्य खलास होणार नाहीं. हे भिक्षु अर्बुदाच्या वीसपट निरर्बुद नरकांत आयुष्य, निरर्बुदाच्या वीसपट अबब नरकांत आयुष्य, अबबच्या वीसपट अहह नरकांत आयुष्य. हे भिक्षु, अहहच्या वीसपट अटट नरकांत आयुष्य. हे भिक्षु, अटटच्या वीसपट कुमुद नरकांत आयुष्य. हे भिक्षु, कुमुदाच्या वीसपट सौगन्धिक नरकांत आयुष्य. हे भिक्षु, सौगन्धिकाच्या वीसपट उत्पलक नरकांत आयुष्य. हे भिक्षु, उत्पलकाच्या वीसपट पुण्डरीक नरकांत आयुष्य. हे भिक्षु, पुण्डरीकाच्या वीसपट पद्म नरकांत आयुष्य. हे भिक्षु, मनांतील शारिपुत्र- मौद्गल्यायनांच्या द्वेषामुळें कोकालिक भिक्षु त्या पद्म नरकांत जन्मला आहे. असें भगवान् म्हणाला. असें म्हणून तदनंतर तो सुगत शास्ता म्हणाला—

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.