पाली भाषेत :-

३०१ गोमण्डलपरिब्बूळ्हं नारीवरगणायुतं।
उळारं मानुसं भोगं अभिज्झायिंसु ब्राह्मणा।।१८।।

३०२ ते तत्थ मन्ते गन्थेता ओक्काकं तदुपागमुं।
पहूतधनधञ्ञोऽसि (यजस्सु बहु ते वित्तं) यजस्सु बहु ते धनं।।१९।।

३०३ ततो च राजा सञ्ञत्तो ब्राह्मणेहि रथेसभो।
अस्समेधं पुरिसमेधं (सम्मापासं) पाजपेथ्यं१(१ रो.-वाचपेय्यं.) निरग्गळं।
एते यागे यजित्वान ब्राह्मणानं अदा धनं।।२०।।

३०४ गावो सयनं च वत्थं च नारियो२( २ रो.-नारियो च.) समलंकता।
रथे चाजञ्ञसंयुत्ते सुकते चित्तसिब्बने।।२१।।

मराठीत अनुवाद :-


३०१. गाईंचीं खिल्लारें आणि सुन्दर स्त्रियांचे समुदाय, अशा समृद्ध मानवी उपभोगांचा ब्राह्मणांना लोभ सुटला. (१८)

३०२. तेव्हां त्याकरितां मन्त्र रचून ते इक्ष्वाकूपाशीं गेले आणि म्हणाले, “तुजपाशीं पुष्कळ धनधान्य आहेस तूं यज्ञ कर, तुझ्याजवळ संपत्ति फार आहे, तूं यज्ञ कर.”

३०३. अशी ब्राम्हणांनीं समजूत घातली तेव्हां त्या रथर्षभ राजानें अश्वमेध, पुरुषमेव, शम्या-प्रास१(सविस्तर स्पष्टीकरणार्य Poona Uni. Journal I.i. 78-88 (1953) & B.O.R.I. Annals XXXII (1951) 53-55 पहा.) (ज्यांत शम्या फेकली जाते), वाजपेय आणि निरर्गड१ (सविस्तर स्पष्टीकरणार्य Poona Uni. Journal I.i. 78-88 (1953) & B.O.R.I. Annals XXXII (1951) 53-55 पहा.) असे यज्ञ करून ब्राह्मणांना धन दिलें. (२०)

३०४. गाई, बिछाईत, वस्त्र आणि अलंकृत स्त्रिया, उत्तम घो़डे जोडलेले आणि उत्तम रीतीनें तयार केलेले व आच्छादन घातलेले रथ, (२१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel