पाली भाषेत :-

[७.वसलसुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्स आरामे। अथ खो भगवा पुब्बण्हसमयं निवासेत्वा पत्तचीवरमादाय सावत्थियं पिण्डाय पाविसि। तेन खो पन समयेन अग्गिकभारद्वाजस्स ब्राह्मणस्स निवेसने अग्गि पञ्ञलितो होति, आहुति पग्गहिता। अथ खो भगवा सावत्थियं सपदानं पिण्डाय चरमाने येन अग्गिकभारद्वाजस्स ब्राह्मणस्स निवेसनं तेनुपसंकमि। अद्दसा खो अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवन्तं दूरतो व आगच्छन्तं। दिस्वान भगवन्तं एतदवोच- तत्रेव मुण्डक, तत्रेव समणक, तत्रेव वसलक तिट्ठाही ति। एवं वुत्ते भगवा अग्गिकभारद्वाजं ब्राह्मणं एतदवोच- जानासि पन त्वं ब्राह्मण वसलं वा वसलकरणे वा धम्मे ति। न ख्वाहं भो गोतमो जनामि वसलं वा वसलकरमे वा धम्मे | साधु मे भवं गोतमो तथा धम्मं देसेतु, यथाऽहं जानेय्यं वसलं वा वसलकरणे वा धम्मेति। तेन हि ब्राह्मण सुणाहि, साधुकं मनसि करोहि, भासिस्सामी ति। एवं भो ति खो अग्गिकभारद्वाजो ब्राह्मणो भगवतो पञ्चस्सोसि। भगवा एतदवोच-

मराठीत अनुवाद :-                                    ७
[७.वसलसुत्त]


असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडकाच्या आरामांत राहात होता. तेव्हां भगवान् सकाळच्या प्रहरीं वस्त्र परिधान करून व पात्र-चीवर घेऊन श्रावत्तींत भिक्षाटनाला गेला. त्या समयीं आग्निक-भारद्वाज-ब्राह्मणाच्या घरीं अग्नि प्रज्वलित केलेला होता, व आहुति देण्यांत येत होती. तेव्हां भगवान् श्रावस्तीमध्यें घरोघरी क्रमश: भिक्षेसाठीं फिरत असतां आग्निक-भारद्वाज-ब्राह्मणानें भगवन्ताला दुरूनच येतांना पाहिलें; व पाहून भगवन्ताला म्हणाला, “हे मुण्डक, हे श्रमणक, हे वृषलक, तेथेंच उभा राहा.” असें बोलल्यावर भगवान् आग्निक-भारद्वाज-ब्राह्मणाला म्हणाला, “हे ब्राह्मणा, तूं वृषल कोण व वृषलाचे गुण कोणते हें जाणतोस काय?” “गोतमा, वृषल किंवा वृषलाचे गुण कोणते हें मीं जाणत नाहीं. भगवान् गोतमानें मला असा धर्मोपदेश करावा कीं जेणेंकरून वृषल कोण व वृषलाचे गुण कोणते हें मी जाणूं शकेन.” “असें आहे तर, हे ब्राह्मणा, ऐक व नीट लक्षांत घे. हें मी तुला सांगतों.” “ठीक आहे” असें आग्निक-भारद्वाज-ब्राह्मणानें भगवन्ताला उत्तर दिलें. आणि भगवान् म्हणाला—

पाली भाषेत :-


११६ कोधनो उपनाही च पापमक्खी च यो नरो।
विपन्नदिट्ठि मायावी तं जञ्ञा वसलो इति।।१।।

११७ एकजं वा द्विजं वाऽपि योध पाणं विहिंसति।
यस्स पाणे दया नत्थि तं जञ्ञा वसलो इति।।२।।

११८ यो हन्ति परिरुन्धति गामानि निगमानि च।
निग्गाहको समञ्ञातो तं जञ्ञा वसलो इति।।३।।

११९ गामे वा यदि वाऽरञ्ञे यं परेसं ममायितं।
थेय्या अदिन्नं आदियति तं जञ्ञा वसलो इति।।४।।

१२० यो हवे इणमादाय चुज्जमानो पलायति।
न हि ते इणमत्थी ति तं जञ्ञा वसलो इति।।५।।

१२१ यो किञ्चिक्खकम्यता पन्थस्मिं वजतं जनं।
हन्त्वा किञ्चिक्खमादेति तं जञ्ञा वसलो इति।।६।।

मराठीत अनुवाद :-

११६. रागीट, सूड उगविण्याची बुद्धि धरणारा, पापी, गुणीजनांस दोष लावणारा, मिथ्या-दृष्टि आणि मायावी अशा माणसाला वृषल समजावें. (१)

११७. जरायुज किंवा अंडज प्राण्यांचा जो वध करतो, ज्याला प्राण्यांची दया नाहीं, त्याला वृषल समजावें. (२)

११८. जो गांवें आणि शहरें यांना वेढा घालून लुटतो, उध्वस्त करतो, ज्याला लुटारू म्हणून ओळखतात, त्याला वृषल समजावे. (३)

११९. गांवांत किंवा अरण्यांत जो इतरांच्या मालकीची वस्तु न दिली असतां, घेतों त्याला वृषल समजावें. (४)

१२०. जो ऋण घेऊन, तें परत मागितलें असतां, ‘तुझें मी देणेंच नाहीं’ असें म्हणून पळ काढतो, त्याला वृषल समजावें. (५)

१२१. जो कोणत्याही पदार्थाच्या इच्छेने वाटमारेपणा करून लोकांस लुटतो, त्याला वृषल समजावें. (६)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel