पाली भाषेतः-

६२८ असंसट्ठं गहट्ठेहि अनागारेहि चूभयं।
अनोकसारिं१(१ म.-अनोकचारिं) अप्पिच्छं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३५।।

६२९ निधाय दण्डं भूतेसु तसेसु थावरेसु च।
यो न हन्ति न घोतेति तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३६।।

६३० अविरुद्धं विरुद्धेसु अत्तदण्डेसु निब्बुतं।
सादानेसु अनादानं तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३७।।

६३१ यस्स रागो च दोसो च मानो मक्खो च पा२तितो।(२ म.-ओहितो.)
सासपोरिव आरग्गा तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३८।।

६३२ अकक्कसं विञ्ञ३पपिं(३ म.,अ.-विञ्ञापनिं.) गिरं सच्चं उदीरये।
याय नाभिसजे कञ्चि तमहं ब्रूमि ब्राह्मणं।।३९।।

मराठीत अनुवाद
:-

६२८. गृहस्थ आणि परिव्राजक या उभयतांच्या संसर्गापासून मुक्त, गृहबुद्धीपासून दूर राहणारा व अल्पेच्छ, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३५)

६२९. त्रस आणि स्थावर भूतमात्रांविषयी दण्डबुद्धि सोडून जो हिंसा करीत नाहीं, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३६)

६३०. विरोधीं लोकांत अविरोधी, आत्मदंडन करणार्‍यांत शांत व आदान करणार्‍यांत (लोभी जनांत) अनादान, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३७)

६३१. ज्याचे काम, क्रोध, अहंकार आणि (परगुणांबद्दल) तिरस्कार—हे अग्रावरील मोहरीच्या दाण्याप्रमाणें गळाले, त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३८)

६३२. अकर्कश, आर्जवी, सत्य व जें कोणालाही खुपणार नाहीं असेंच वचन बोलणारा. त्याला मी ब्राह्मण म्हणतों.(३९)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel