पाली भाषेतः-

३८
[१२. द्वयतानुपस्सनासुत्तं]


एवं मे सुतं। एकं समयं भगवा सावत्थियं विहरति पुब्बरामे मिगारमातुपासादे। तेन खो पन समयेन भगवा तदहुपासथे पण्णरसे पुण्णाय पुण्णमाय रत्तिया भिक्खुसंघपरिवुतो अब्भोकासे निसिन्नो होति। अथ खो भगवा तुण्हीभूतं तुण्हीभूतं भिक्खुसंघं अनुविलोकेत्वा भिक्खू आमन्तेसि-ये ते भिक्खवे कुसला धम्मा अरिया निय्यानिका सम्बोधगामिनो तेसं वो भिक्खवे कुसलानं धम्मानं अरियानं निय्यानिकानं सम्बोधगामीनं का उपनिसा सवनाया ति, इति चे भिक्खवे पुच्छितारो अस्सु, ते एवं अस्सु वचनीया-यावदेव द्वयतानं धम्मानं यथाभूतं ञाणाया ति। किं च द्वयतं वदेथ-इदं दुक्खं अयं दुक्खसमुदयो ति अयं एकानुपस्सना, अयं दुक्खधिरोधो अयं दुक्खनिरोधगामिनी पटिपदा ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्माद्वयतानुपस्सिनो खो भिक्खवे भिक्खुनो अप्पमत्तस्स आतापिनो पहितत्तस्स विहरतो द्विन्नं फलानं अञ्ञतरं फलं पाटिकंखं-दिट्ठे व धम्मे अञ्ञा, सति वा उपादिसेसे अनागामिता ति। इदमवोच भगवा, इदं वत्वा सुगती अथापरं एतदवोच सत्या—

मराठी अनुवादः-

३८
[१२. द्वयतानुपस्सनासुत्त]


असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् श्रावस्ती येथें पूर्वारामांत मिगारमातेच्या प्रासादांत राहत होता. त्या वेळीं पौर्णिमेच्या उपोसथाच्या दिवशीं पूर्ण पौर्णिमेच्या रात्रीं भगवान् भिक्षुसंघासह उघड्या जागीं बसला होता. तेव्हां चुपचाप बसलेल्या भिक्षुसंघाकडे पाहून भगवान् भिक्षूंना म्हणाला- भिक्षूंनो, जे ते कुशल, आर्य, निर्यानक व संबोधगामी धर्म आहेत, त्या कुशल, आर्य, निर्यानक व संबोधगामी धर्माच्या श्रवणापासून (शिक्षणापासून) फायदा कोणता असें जर, भिक्षूंनो, तुम्हांस विचारणारे आढळले, तर त्यांना म्हणावें कीं, द्वैत धर्माचें (पदार्थाचें) यथार्थ ज्ञान करून घेणें हा फायदा होय. तें द्वैत कोणतें म्हणतां? दें दु:ख व हा दु:खसमुदय मिळून एक अनुपश्यना, आणि हा दु:खनिरोध व हा दु:खनिरोधगामी मार्ग मिळून दुसरी अनुपश्ययना. भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची सम्यक्-अनुपश्यना करणार्‍या, अप्रमत्त, उत्साही व दृढचित्त होऊन वागणार्‍या भिक्षूला याच जन्मीं अर्हत्त्व किंवा, उपादानशेष राहिल्यास, अनागामिता—या दोहोंपैकीं एक फळ मिळण्याची अपेक्षा करतां येईल. असें भगवान् म्हणाला. असें म्हणून तदनंतर तो सुगत शास्ता म्हणाला—
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel