पाली भाषेत :-

९२२ चक्खूहि नेव लोलस्स। गामकथाय आवरये सोतं।
रसे च नानुगिज्झेय्य। नच ममायेथ किञ्चि लोकस्मिं।।८।।

९२३ फस्सेन यदा फुट्ठस्स। परिदेवं भिक्खु न करेय्य कुहिं चि।
भवं च नाभिजप्पेय्य। भेरवेसु च न संपवेधेय्य।।९।।

९२४ अन्नानमथो पानानं। खादनीयानमथोऽपि वत्थानं।
लद्धा न सन्निधिं कयिरा। न च परित्तसे तानि अलभमानो।।१०।।

९२५ झायी न पादलोलस्स। विरमे कुक्कुच्चा१ नप्पमज्जेय्य। (१ सी.-कुक्कुच्चं.)
अथ आसनेसु सयनेसु। अप्पसद्देसु भिक्खु विहरेय्य।।११।।

मराठीत अनुवाद :-

९२२. डोळ्यांनीं चंचळ नसावें, गांवांतील गप्पा-गोष्टींपासून कानांचें रक्षण करावें, (जिभेच्या) गोडींत लुब्ध होऊं नये, आणि जगांत कशाचेंहि ममत्व बाळगूं नये. (८)

९२३ (दु:खद) स्पर्शांचा संयोग झाला असतां भिक्षूनें मुळींच शोक करूं नये. भवाची आकांक्षा बाळगूं नये आणि भेसूर देखावा पाहून घाबरूं नये. (९)

९२४ अन्न, पान, खाद्य आणि वस्त्र हे पदार्थ मिळाले असतां त्यांचा संग्रह करूं नये आणि ते मिळाले नसतां त्रास मानूं नये. (१०)

९२५ भिक्षूनें ध्यानरत व्हावें, पायांनीं चंचल होऊं नये, सर्व प्रकारचें कौकृत्य१ (१ मानसिक विकृति दाखविणारे शारीरिक हातापायाचे चाळे, किंवा चांगल्या गोष्टीला वाईट व वाइटाला चांगलें म्हणणें, किंवा करण्याजोगी गोष्ट केली नाहीं म्हणून किंवा न करण्याजोगी गोष्ट केली म्हणून मनाला होणारी बोचणी. बौद्ध-संस्कृत ग्रंथांतून ‘कु-कृत्या’बद्दल हाच शब्द योजलेला आहे.) सोडून द्यावें. बेसावध राहूं नये आणि जेथें गडबड कमी असेल अशा बसण्या-निजण्याच्या जागीं रहावें. (११)

पाली भाषेत :-


९२६ निद्दं न बहुलीकरेय्य१ । जागरियं भजेय्य आतापी। (१ म.-बहुलं न करेय्य.)
तन्दिं मायं हस्सं खिड्डं। मेथुनं विप्पजहे सविभूसं।।१२।।

९२७ आथब्बणं सुपिनं लक्खणं। नो विदहे अथो पि नक्खत्तं।
विरुतं२ च गब्भकरणं। तिकिच्छं मामको न सेवेय्य।।१३।। (२ नि.-विरुदं.)

९२८ निन्दाय नप्पवेधेय्य। न उण्णमेय्य पसंसितो भिक्खु।
लोभं सह मच्छरियेन। कोधं पेसुणियं च पनुदेय्य।।१४।।

९२९ कयविक्कये न तिट्ठेय्य। उपवादं भिक्खु न करेय्य कुहिं चि।
गामे च नाभिसज्जेय्य। लाभकम्या जनं न लपयेय्य।।१५।।

मराठीत अनुवाद :-

९२६ त्यानें निद्रा वाढवूं नये, उत्साही होऊन जागृति वाढवावी, आणि तन्द्री, माया, हास्य, क्रीडा, स्त्रीसंग आणि भूषणें यांचा त्याग करावा. (१२)

९२७ माझ्या श्रावकानें अथर्वणमंत्र, स्वप्नफल, स्त्रीपुरुषलक्षणें आणि नक्षत्रफल सांगणें या गोष्टींत पडूं नये; तसेंच मृगपक्ष्यांच्या शब्दांचीं फळें सांगणें, गर्भधारणेचा मंत्र आणि चिकित्सा यांच्याही (भानगडींत) पडूं नये. (१३)

९२८ भिक्षूनें आपली निंदा ऐकून चलबिचल होऊं नये, आणि स्तुति ऐकून गर्व मानूं नये. त्यानें लोभ, मात्सर्य, क्रोध आणि चहाडी यांचा त्याग करावा. (१४)

९२९ भिक्षूनें क्रयविक्रय करूं नये, ठपका येईल असें कोणतेंही कृत्य करूं नये, गांवांतील लोकांशीं सलगी करूं नये, आणि आपल्या लाभास्तव लोकांबरोबर बडबड करूं नये. (१५)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel