पाली भाषेतः-

७९२ सयं समादाय वतानि जन्तु। उच्चावचं गच्छति सञ्ञसत्तो१।(१ सी.-पञ्ञ. म.-सञ्ञतत्तो, अञ्ञतत्तो.)
विद्वा च वेदेहि समेच्च धम्मं। न उच्चावचं गच्छति भूरिपञ्ञो।।५।।

७९३ स२ सब्बधम्मेसु२(२-२ सी.-सब्बेसु धम्मेसु.) विसेनिभूतो। यं किञ्चि दिट्ठं व३(३ म.-वा.) सुतं मुतं वा।
तमेवदस्सिं विवटं चरन्तं। केनीध लोकस्मिं४(४ म., Fsb-स्मि.) विकप्पयेय्य।।६।।

७९४ न कप्पयन्ति न पुरेक्खरोन्ति५(५ म.-पुरक्ख.)। अच्चन्तसुद्धी६(६ म.-सुद्धिं.)
ति न ते वदन्ति।
आदानगन्थं गथितं विसज्ज। आसं न कुब्बन्ति कुहिंचि लोके।।७।।

मराठी अनुवादः-

७९२. प्राणी स्वत:च व्रतें आचरून संज्ञे (कल्पने) मध्यें आसक्त होतो व उच्चनीच भवाला जातो. पण विपुलप्रज्ञ विद्वान् वेदांनी (प्रज्ञेनें) धर्म जाणून उच्चनीच भवाला जात नाहीं.(५)

७९३ जें काहीं दृष्ट, श्रुत आणि अनुमित असेल (त्या सर्वांवर विजय मिळविल्यामुळें) त्यांपैकी कशांशीही विरोधीभाव१(१ विरोधीभाव न बाळगणारा याबद्दल मूळ शब्द ‘विसेनिभूत’ असा आहे व त्याचा ‘मारसेन वानासेत्वा ठितभावेन विसेनिभूतो’ असा अट्ठकथाकारानें अर्थ केला आहे.) न बाळगणारा, व अशानेंच शुद्धि होते असें पाहणारा, सर्व गोष्टी उघड उघड करणारा, अशा त्याला या जगीं कोणचा आणि कसला विकल्प असणें शक्य आहे?(६)

७९४ ते विकल्पांत पडत नाहींत, एकाद्या गोष्टीचा पुरस्कार करीत नाहींत, व हीच अत्यंत शुद्धि आहे असें म्हणत नाहींत. आणि ते उपादानांनीं बांधलेली गांठ (ग्रन्थि) सोडून या जनांत कशाचीही आशा धरीत नाहींत.(७)

पाली भाषेत :-

७९५ सीनातिगो ब्राह्मणो तस्स नत्थि। ञत्वा व१ दिस्वा व१(१ सी., म.-च.) समुग्गहीतं।
न रागरागी न विरागरत्तो२(२ सी., म-पि रागरत्तो.)। तस्सीध३(३ म.-तस्स यिध.) नत्थि४(४ रो.-नत्थी.) परमुग्गहीतं ति।।८।।

सद्धट्ठकसुत्तं निट्ठितं।

४३
[५. परमट्ठकसुत्तं]


७९६ परमं ति दिट्ठीसु५(५ सी., म.-दिट्ठिसु.) परिब्बसानो। यदुत्तरि६(६ म.-उत्तरि.) कुरुते जन्तु लोके।
हीना ति अञ्ञे ततो सब्बामाह। तस्मा विवादानि अवीतिवत्तो।।१।।

मराठीत अनुवाद :-

७९५ ज्या ब्राह्मणानें आपलेपणाच्या सीमा उल्लंघिल्या, तो कोणतीही वस्तु जाणून किंवा पाहून तिला पकडून बसत नाहीं. तो रागरागी (कामासक्त) नव्हे व विरागरागीहि नव्हे; या जगांत अमुक एक दृष्टी परमश्रेष्ठ आहे असें तो समजत नाहीं.(८)

सद्धट्ठकसुत्त समाप्त

४३
[५. परमट्ठकसुत्त]

७९६ सर्व दृष्टींत (पंथांत) आपली दृष्टि उत्तम असें समजून चालणारा प्राणी या जगांत आपल्या पंथाला महत्त्व देतो, व त्याहून इतर पंथ हीन आहेत असें म्हणतो; व यामुळें तो विवादांच्या पलीकडे जात नाहीं.(१)
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel